Header Ads

मजरे कासारवाडा येथे स्वामी समर्थ क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे उद्घाटन उत्साहात संपन्न

 मजरे कासारवाडा येथे स्वामी समर्थ क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे उद्घाटन उत्साहात संपन्न.

राधानगरी :-मजरे कासारवाडा (ता. राधानगरी) येथे स्वामी समर्थ क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या उद्घाटनाचा सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे यांनी ठेवीदारांना चांगला लाभ देतानाच शेतकरी, होतकरू व्यावसायिक आणि गरजू नागरिकांना अर्थसहाय्य करून सक्षम करण्याचे कार्य संस्था निश्चितपणे करेल, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकुळचे माजी संचालक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. किसन चौगले होते, तर केडीसीसीचे संचालक रणजितसिंह पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

संस्थापक चेअरमन संदीप ढेकळे यांनी प्रास्ताविकात ठेवीदारांचा विश्वास जपत पारदर्शक कारभार करून संस्था अल्पावधीत नावारूपाला आणण्याची ग्वाही दिली. यावेळी संस्थेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. तसेच दोन लाखांहून अधिक ठेव करणाऱ्या ठेवीदारांचा २४ कॅरेट सोन्यातील स्वामी समर्थांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून कासारवाडा येथील महिलांसाठी एकदिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले. रणजितसिंह पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सहलीच्या बसांना हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

या कार्यक्रमास बापूसो वारके, डॉ. के. डी. वारके, शामराव वारके, एकनाथ ढेकळे, शांताराम तौंदकर, तुकाराम जितकर, रवींद्र फराकटे, सुनील जितकर यांच्यासह संस्थेचे सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. भोसले यांनी तर आभार प्रदर्शन बाबुराव साबळे यांनी केले.

No comments:

Powered by Blogger.