गुणवत्ता अमर्याद असावी’ – शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर
गुणवत्ता अमर्याद असावी’ – शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर.
-----------------------------------इंदापूर प्रतिनिधी गणेश धनवडे.
-----------------------------------``
विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेतील गुणांपुरते मर्यादित न राहता विचार करण्याची क्षमता, चिकित्सक दृष्टिकोन आणि विविध कौशल्यांचा विकास साधला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या विचारकौशल्याची व गुणवत्तेची कोणतीही मर्यादा असता कामा नये, तर गुणवत्ता ही अमर्याद असावी, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी (माध्यमिक विभाग, जिल्हा परिषद पुणे) भाऊसाहेब कारेकर यांनी केले.
संस्थाचालक शिक्षण मंडळ, पुणे जिल्हा व अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने एसएससी बोर्ड परीक्षेत मार्च २०२६ मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व सत्कार समारंभ पुणे येथील शाहू कॉलेज, पर्वती पायथा येथे आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कारेकर बोलत होते.
कारेकर म्हणाले, “गुणवत्ता ही केवळ गुणपत्रिकेतील आकड्यांवर ठरत नाही. विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारे विचारकौशल्य, समस्या सोडविण्याची क्षमता, सर्जनशीलता आणि परिस्थितीचे आकलन करण्याची क्षमता ही खरी गुणवत्ता आहे. या गुणवत्तेला कोणतीही मर्यादा नसावी.” विद्यार्थ्यांनी मिळालेल्या यशाचा उपयोग भविष्यातील मोठ्या ध्येयांसाठी करावा, असेही त्यांनी सांगितले.यावेळी इंदापूर तालुक्यातील माध्यमिक विद्यालय तावशी विद्यार्थीनी सायली विजय गोरे व माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी विद्यार्थीनी समृद्धी नवनाथ आटोळे यांनी गुणवत्ता यादीत चमकलेल्या विद्यार्थीनी व पालकांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी संस्था सचिव विरसिंह रणसिंग,मुख्याध्यापक बी.डी.कदम ,संभाजी रणवरे ,वैभव खरात,नवनाथ आटोळे उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष ‘कृषिभूषण’ अनिलराव मेहेर यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास संस्थाचालक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विजयदादा कोलते,उपाध्यक्ष प्रमिला गायकवाड,उपाध्यक्ष अनिल मेहेर, सचिव ॲड संग्राम कोंडे ,खजिनदार महेश ढमढेरे,सहसचिव विरसिंह रणसिंग,संचालक प्रदिप वळसे पाटील,संचालक गणपत बालवडकर तसेच संस्थेचे पदाधिकारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments: