Header Ads

कांदळीत नाच गाण्याच्या 'बारी'वरून वाद, गोळीबारात एक जखमी; ४ जणांविरोधात गुन्हा

 कांदळीत नाच गाण्याच्या 'बारी'वरून वाद, गोळीबारात एक जखमी; ४ जणांविरोधात गुन्हा.

---------------------------------

कैलास बोडके.

-----------------------------------

जुन्नर तालुक्यातील कांदळी येथे कार्यक्रमातील नाच गाण्याच्या 'बारी' लावण्याच्या वादातून पहाटे गोळीबार झाल्याची घटना घडली. या गोळीबारात एकजण जखमी झाला. या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी ४ जणांविरोधात खुनाच्या प्रयत्नासह शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

शनिवार दि.८ऑगस्ट रोजी पहाटे अंदाजे ४:३०च्या दरम्यान कांदळी येथील तुळजाभवानी संस्कृती कलाकेंद्रात ही घटना घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारुळवाडी येथील अक्षय अनिल धोंगडे, वय ३८ हे सहकाऱ्यांसह कार्यक्रमासाठी कलाकेंद्रात आले होते. त्याचवेळी कोळेकर, आण्णा, चिनु आणि एक अनोळखी इसम यांनी तिसरी बारी न लावल्याच्या कारणावरून गोंधळ घातला. 

कलाकेंद्राच्या मालकीण मनीषा, अक्षय धोंगडे आणि कामगारांशी त्यांचा वाद झाला. वाद वाढून शिवीगाळ, मारहाण झाली. यावेळी आरोपींपैकी एकाने पिस्टल काढून अक्षय धोंगडे यांच्यावर गोळी झाडली. "मारू का?" असे म्हणत त्यांनी दोनदा गोळी झाडण्याचा प्रयत्न केला  असल्याची माहिती पोलिसांनी  दिली आहे.

अक्षय बचावले. मात्र त्यावेळी बाजूला उभे असलेले _फिरोज कादीर शेख, वय 31, रा. ओतुर, भोईगल्ली, ता. जुन्नर_ यांना गोळी लागली आणि ते जखमी झाले.

या प्रकरणी अक्षय धोंगडे यांच्या फिर्यादीवरून नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

गुन्हा पोलीस उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे यांनी दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील हे करत आहेत. जखमी फिरोज शेख यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्व आरोपी फरार असून पोलिस  त्यांचा शोध घेऊन लवकरच अटक करतील अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी दिली. या घटनेमुळे कांदळीसह परिसरात भीतीचे वातावरण आहे.

No comments:

Powered by Blogger.