शिवशाही प्रतिष्ठानच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी शुभम गजभिये यांची नियुक्ती…
शिवशाही प्रतिष्ठानच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी शुभम गजभिये यांची नियुक्ती…
चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा पळसगाव येथील रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार शुभम गजभिजे यांची सामाजिक बांधिलकी व समाजाप्रती तत्परता बघता आपली शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य “चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी” नियुक्ती करण्यात आली आहे.
हि जबाबदारी देऊन आपण येणाऱ्या काळात अधिक प्रमाणात संगठन बळकट कराल व अन्याया विरोधात आवाज उठवाल व शिव-शंभू-शाहू-फूले-साठे-आंबेडकर यांचे विचार महाराष्ट्रात ठामपणे मांडाल व,”जिथे कमी तिथे आम्ही,या तत्वावर चालाल अशी अपेक्षा शिवप्रतिष्ठानचे संस्थापक राज गोविंद जाधव यांनी व्यक्त केली आहे.
तद्वतच त्यांनी पुढिल वाटचालीस शुभम गजभिये यांना शुभेच्छा प्रदान केलेल्या आहेत.

No comments: