Header Ads

परळीतील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा वीजपुरवठा महिनाभरापासून खंडित; भात चिखलणीच्या कामांवर परिणाम

 परळीतील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा वीजपुरवठा महिनाभरापासून खंडित; भात चिखलणीच्या कामांवर परिणाम

~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रतिनिधी - अमर इंदलकर.
~~~~~~~~~~~~~~~~~~

परळी (ता. सातारा) : परळी परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा वीजपुरवठा गेल्या एक महिन्यापासून खंडित असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. सध्या भात लागवडीपूर्वीच्या चिखलणीच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असताना वीज नसल्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत.

शेतकऱ्यांनी महावितरणच्या संबंधित कर्मचाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला असता, "माणसं उपलब्ध नाहीत", "झाड पडल्यामुळे लाईन दुरुस्त करता आलेली नाही" अशी विविध कारणे दिली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मात्र, महिनाभर उलटूनही वीजपुरवठा पूर्ववत झालेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

वीजपुरवठा बंद असल्याने शेतीपंप सुरू करता येत नसून भात चिखलणीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतीची नियोजित कामे विस्कळीत झाली असून शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित वीजवाहिनीची दुरुस्ती करून शेतीपंपाचा वीजपुरवठा त्वरित सुरू करावा, अशी मागणी परळीतील शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

No comments:

Powered by Blogger.