Header Ads

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ओतूर पोलिसांचा रूट मार्च; कायदा-सुव्यवस्थेचा आढावा.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ओतूर पोलिसांचा रूट मार्च; कायदा-सुव्यवस्थेचा आढावा.




आळेफाटा (प्रतिनिधी )आगामी गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने ओतूर (ता. जुन्नर )पोलीस स्टेशनच्या वतीने गुरुवारी दि. ११रोजी सायंकाळी ओतूर शहरात रूट मार्च काढण्यात आला.

शहरातील प्रमुख मार्ग, संवेदनशील ठिकाणे आणि गर्दीच्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली. यावेळी पोलिस दलाच्या सज्जतेबाबत नागरिकांना विश्वास देण्यात आला. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी म्हणून हा रूट मार्च घेण्यात आला.




त्यानंतर सायंकाळी संभाव्य आपत्कालीन परिस्थिती, जमाव नियंत्रण आणि तात्काळ परिस्थिती नियंत्रण या अनुषंगाने पोलिस दलाची कार्यक्षमता व तयारी तपासण्यात आली.

या रूट मार्चमध्ये पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस निरीक्षक शुभम कुमार जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या सूचनेनुसार ओतूर पोलीस स्टेशनचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, संदीप आमने,पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी आणि जुन्नर उपविभागाकडून  आरसीपी जवान सहभागी झाले होते.

गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात साजरा व्हावा, यासाठी पोलीस प्रशासनाकडून पूर्वतयारी व प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू असल्याची माहिती ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी दिली.

No comments:

Powered by Blogger.