ओतूर : लोकअदालतीत ९ खटले निकाली, ६१ हजारांचा दंड वसूल
ओतूर : लोकअदालतीत ९ खटले निकाली, ६१ हजारांचा दंड वसूल.
कैलास बोडके.
------------------------
ओतूर (ता. जुन्नर) - येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ९ गुन्ह्यांचा दि. १२ सप्टेंबर रोजी जुन्नर न्यायालयात झालेल्या लोकअदालतीत निकाल लागला. दारू पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी सहा जणांना प्रत्येकी दहा हजार रुपये, तर अन्य तीन जणांना प्रत्येकी पाचशे रुपये याप्रमाणे एकूण ६१ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
दंड झालेल्यांमध्ये राजु उत्तम राठोड (उंब्रज), गणेश ज्ञानदेव भापकर (वडुले, ता. पारनेर), मिलिंद सुनिल औटी (हिवरे खुर्द), भिमा शंकर वाजे (कळस, ता. अकोले), रामभाऊ हरिभाऊ काळे (साकूर, ता. संगमनेर), तेजस राजेंद्र कोंडे (धामणखेल) यांचा समावेश आहे. या सर्वांवर मोटार वाहन कायदा कलम १८५ नुसार कारवाई करण्यात आली होती.
तसेच सदाशिव लक्ष्मण लांडगे, अंकुश बाळाशी लोहोटे, सौरभ संतोष भिसे यांना भारतीय न्याय संहिता कलम २८१, २८५ नुसार प्रत्येकी ५०० रुपये दंड झाला.
दरम्यान, दि. १७ सप्टेंबर रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, जुन्नर यांच्या न्यायालयात गुन्हा रजिस्टर नंबर २४५/२०२६ मधील आरोपी राजेश रामदास बुरकुल (वय ३३, रा. बोर्हाडेवाडी, मोशी) याने गुन्ह्याची कबुली दिल्याने न्यायालयाने त्याला १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक तावरे, कोर्ट अंमलदार अतुल भेके यांनी पैरवीचे कामकाज पाहिले.

No comments: