खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून एकाची आत्महत्या.मुरगूड पोलिसात गुन्हा दाखल.
खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून एकाची आत्महत्या.मुरगूड पोलिसात गुन्हा दाखल.
---------------------------
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
---------------------------
खासगी सावकाराकडून घेतलेल्या पैशाच्या परतफेडीच्या जादा व्याजाच्या मागणीसह धमकी व मानसीक त्रासाला कंटाळून सोनगे ( ता. कागल) येथील श्रीधर दत्तात्रय डावरे ( वय४८) याने आत्महत्या केली. याबाबत मृताची पत्नी सविता श्रीधर डावरे ( वय ४३) रा. सोनगे ता. कागल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निवास आण्णासो पाटील (रा. बानगे, ता. कागल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे
पोलिसांच्या नोंदीनुसार आरोपी खासगी सावकारी करत असून फिर्यादीच्या मृत पतीने आरोपी निवास पाटील याच्याकडून व्याजाने ९ लाख रु. घेतले होते. त्यापैकी व्याजासह २६ लाख रु. श्रीधरने परत केले होते. तरीही आरोपी हा श्रीधर डावरेकडे २५ लाख रुपये जादा व्याजदराने देकाविषयी मागणी करत होता. यासंदर्भात त्यास धमकी व मारहान केली जात असल्याने या मानसीक त्रासातून श्रीधर डावरेने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच श्रीधरने पत्नी सविताला पाठवलेल्या मोबाईल मेसेजमध्ये ''सविता तु माझ्यासाठी भरपूर केलस पण मी काही करू शकलो नाही, मला माफ कर, मी माझ्या समुजवळ जातो. तु शंभोला फुलासारख सांभाळ" '' मी माझ्या खिशात चिठ्ठी ठेवली आहे" " मला आता सहन होईना" असे तीन मेसेज टाकून त्याखाली कागदावर लिहिलेल्या चिठ्ठीचे दोन फोटो पाठविले. व त्यानंतर विषारी तननाशक सेवन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत मुरगूड पोलिसात नोंद झाली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कांती पाटील करीत आहेत.

No comments: