कृष्णामाई नदीत मृत कोंबड्या फेकल्याने सांगलीकरांमध्ये तीव्र संताप.
कृष्णामाई नदीत मृत कोंबड्या फेकल्याने सांगलीकरांमध्ये तीव्र संताप.
---------------------------------
सांगली प्रतिनिधी
राजू कदम
---------------------------------
दोन दिवसांत कारवाई न झाल्यास पालिकेत 'शवफेको' आंदोलनाचा इशारा!सांगली:पवित्र कृष्णा नदीच्या (कृष्णामाई) पात्रात पुन्हा एकदा अज्ञात इसमांकडून मोठ्या प्रमाणावर मृत कोंबड्या आणि पोल्ट्रीचा कचरा फेकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अत्यंत बेजबाबदार आणि आरोग्याला घातक ठरणाऱ्या कृत्यामुळे सांगलीकरांमध्ये महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी आणि संतापाची लाट उसळली आहे. नदीकिनारी असलेले भटके कुत्रे या पाण्यात उतरून मृत कोंबड्यांचे अवशेष खात असून, ते बाहेर ओढून आणत आहेत. यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून, सांगलीच्या जनतेला दूषित पाणीपुरवठा होण्याचा आणि आरोग्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.प्रशासकीय ढिसाळपणावर नागरिकांचा बोटकृष्णा नदी ही सांगलीची जीवनवाहिनी आहे. मात्र, महापालिका प्रशासन, पोलीस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. नदीपात्रात वारंवार असा कचरा फेकला जात असतानाही कचरा टाकणाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई का केली जात नाही? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.आयुक्त आणि महापौरांना थेट इशाराया प्रकारानंतर सांगलीतील सजग नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासन, आयुक्त व महापौर यांना थेट आणि गंभीर इशारा दिला आहे. "प्रशासनाने येत्या दोन दिवसांत (४८ तासांत) नदीची स्वच्छता करून, कचरा टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले नाहीत, तर नदीतून गोळा केलेले मृत अवशेष थेट महापालिका आयुक्तांच्या आणि महापौरांच्या दालनात (ऑफिसमध्ये) फेकण्यात येतील," असा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतला आहे.तातडीने लक्ष देण्याची गरजनदीकिनारी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवणे आणि नदी प्रदूषित करणाऱ्या पोल्ट्री चालकांवर कायदेशीर बडगा उगारणे अत्यंत गरजेचे आहे. महापालिका प्रशासनाने या विषयाचे गांभीर्य ओळखून तात्काळ पावले उचलली नाहीत, तर सांगलीत मोठे जनआंदोलन भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

No comments: