गुन्ह्यांची माहिती दडवली जातेय का? राधानगरी पोलीस ठाण्याच्या भूमिकेवर पत्रकारांचा सवाल.
गुन्ह्यांची माहिती दडवली जातेय का? राधानगरी पोलीस ठाण्याच्या भूमिकेवर पत्रकारांचा सवाल.
--------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
विजय बकरे
--------------------------------
राधानगरी पोलीस ठाण्याकडून गुन्ह्यांची माहिती पत्रकारांना वेळेवर दिली जात नसल्याचा आरोप पत्रकारांमधून केला जात असून, पोलीस प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सावर्डे-पाटणकर येथे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान काही मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून पोलिसांना मारहाण झाल्याची घटना घडल्याचे सांगितले जात आहे. तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी शासन आणि पोलीस विभागाने घालून दिलेल्या डॉल्बी आवाजाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोणते गुन्हे दाखल झाले, याबाबत पत्रकारांनी राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिंध यांच्याकडे मोबाईलद्वारे माहिती मागितली.
पत्रकारांचा आरोप आहे की, वारंवार संपर्क करूनही या दोन्ही प्रकरणांबाबत स्पष्ट माहिती देण्याचे टाळले जात आहे. त्यामुळे कायदेशीर कारवाई झाली की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला असून पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
पत्रकारांचे म्हणणे आहे की, सार्वजनिक हिताच्या घटनांबाबत अधिकृत माहिती वेळेत उपलब्ध करून देणे ही पोलीस यंत्रणेची जबाबदारी आहे. गुन्ह्यांची माहिती देण्यास टाळाटाळ होत असेल तर त्यामागचे कारण स्पष्ट करावे, अशी मागणी पत्रकारांनी केली आहे.

No comments: