Header Ads

मराठी विद्यापीठात वक्तृत्वातून माहिती अधिकाराचा विचार सोहळा.

 मराठी विद्यापीठात वक्तृत्वातून माहिती अधिकाराचा विचार सोहळा.

मयुर खापरे.

---------------

रिद्धपूर, दिनांक २८ (प्रतिनिधी)

माहिती अधिकार हा लोकशाहीतील  पारदर्शकता उत्तरदायित्व आणि नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचा कायदा आहे. या अधिकारा विषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर येथे माहिती अधिकार दिना निमित्त वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी भाषा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सुबोध भांडारकर असून प्रमुख अतिथी म्हणून डॉ. जयंत चौधरी, जन माहिती अधिकारी तर प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. राजेश बर्डे, परीक्षा नियंत्रक हे प्रामुख्याने उपस्थित होते.

         याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणातून डॉ. सुबोध भांडारकर म्हणाले की अतिशय कमी वेळात खूप चांगला कार्यक्रम आयोजित करून स्पर्धेतील विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने माहितीच्या अधिकाऱ्याबाबत वक्तव्य केले आहे. स्पर्धेत पहिला क्रमांक पटकाविणे किंवा दुसरा क्रमांक पटकाविणे हे महत्त्वाचे नसून स्पर्धेमध्ये सहभागी होणे हे खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येकच नागरिकाला माहिती प्राप्त करण्याचा अधिकार हा माहितीच्या मिळालेल्या अधिकारामुळेच प्राप्त झाला असून मायबोलीचा हक्क सुद्धा सुप्रीम कोर्टाने १२ मे २०२६ रोजी दिला आहे.  तसेच व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणण्याचे कार्य सुद्धा माहितीच्या अधिकारामुळे प्राप्त झाले आहे असेही ते म्हणाले.

        तसेच पुढे म्हणाले की माहितीचा अधिकार केवळ कायदेशीर अधिकार नसून लोकशाही अधिक सक्षम करण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन केले.विद्यार्थ्यांनी संविधानिक मूल्य, नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्य यांची जाणीव ठेवून सामाजिक प्रश्नाकडे चिकित्सक दृष्टीने पहावे असे आवाहन त्यांनी केले. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास पूर्ण वक्तव्य प्रभावी मांडणी आणि विषयाचे सखोल आकलन यांचे दर्शन घडविले.

          याप्रसंगी प्रास्ताविक पर भाषणात डॉक्टर जयंत चौधरी म्हणाले की माहितीचा अधिकार हा २००५ मध्ये महाराष्ट्र शासनाने स्वीकार केला याकरिता अनेक आंदोलने होऊन ज्यामध्ये अण्णाभाऊ हजारे यांचे योगदान हे देखील अतिशय महत्त्वपूर्ण आहे. व्यक्तीला आधी मतदानापुरतेच अधिकार होते पण माहितीच्या अधिकारामुळे प्रशासनामध्ये लोक काय करीत आहे याची माहिती घेण्याचा अधिकार सुद्धा माहितीच्या अधिकारामुळे प्राप्त झाला आहे. नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होऊन कामकाजामध्ये पारदर्शकता निदर्शनात येत आहे असेही ते म्हणाले तसेच विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा या अनुषंगाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे असे प्रतिपादन केले.

          मराठी अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी कु. अंकिता देशमुख तर कुमारी छाया वाईंदेशकर या विद्यार्थिनींने माहितीचा अधिकार हा नागरिकांना शासनाच्या कामकाजाबाबत माहिती मिळवून देणारा महत्त्वपूर्ण कायदेशीर अधिकार असल्याचे सांगितले शासनाच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविण्यासाठी या अधिकाराची भूमिका महत्त्वाची असल्याचेही विद्यार्थ्यांनी नमूद केले. आत्मविश्वास पूर्ण वक्तृत्व प्रभावी मांडणी आणि विषयाचे सखोल आकलन यांचे दर्शन घडविले तसेच माहिती अधिकाराविषयी जनजागृतीचा संदेशही देण्यात आला.

कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून डॉ. शुभम बुटले व प्रा. डॉ. आशालाता गुट्टे लाभले होते. वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. अंकिता देशमुख हिने पटकाविला असून द्वितीय क्रमांकाची मानकरी कु.छाया वाईंदेशकर ही विद्यार्थिनी ठरली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठी भाषा विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचारी विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमास विद्यापीठातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.