मौजे मोहा (ई) नऊ तांड्यातील दारू बंदीसाठी महिला धडकल्या पुसद शहर पोलीस स्टेशनला...!!
मौजा मोहा (ई) नऊ तांड्यातील दारू बंदीसाठी महिला धडकल्या पुसद शहर पोलीस स्टेशनला...!! अवैद्ध गावठी दारू व वरळी मटका त्वरीत बंद करण्यात यावे असे अश्याचे निवेदन ठाणेदारास..!
सिद्धार्थ कदम पुसद तालुका प्रतिनिधी.
------_-------------------------------------
पुसद शहरच्या हद्दीतील येत असलेल्या मौजे मोहा (ई) येथील नऊ तांड्यातील विक्री करीत असलेले गावठी दारू,देशी दारू, व वरळी मटका यांचा राजरोष पणे खुलेआम अवैद्ध धंदे सुरू असुन याकडे पोलीस प्रशांसनाचे दुर्लक्ष केले जात आहे.वास्तविक पहाता वरळी मटका घेणाराचे नाव बादल उद्धव चव्हाण हा दोन-तिन वर्षा पासून गणु नाईक तांड्यात खुलेआम मटका दिवसा ढवळ्या चालवीत असुन माझे कोणीच वाकडे करू शकत नाही. अश्या प्रकारची उंदड पणाची भाषा बोलल्या जाते. त्यामुळे या वरळी मटका अड्ड्यावर एक वेळा थातुर- मातुर पोलिसांचा छापा टाकण्यात आला होता. त्यामुळे गावातील महिला या त्रासाला कंटाळून त्यांनी आपल्या लेखी निवेदनात स्पस्ट म्हटले आहे की जर दारू व वरळी मटका तात्काळ कायम स्वरूपी बंद न झाल्यास आम्हा महिलांना व नागरीकांना ना इलाजासत्व तक्रार देण्याची वेळ आली असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आम्ही सर्व मोहा ई येथील रहिवासी असून आम्हा महीलानां नाहाक त्रास सहन सोसावा लागत आहे. मोहा या गावाला लागुनच असलेल्या गणुनाईक तांडा रामनगर व नंदीपूर या ताड्यातील दारू विक्रेते राजरोषपणे खुले आम गावठी दारू,देशी दारू, विक्री करत असून याकडे पोलीस प्रशांसनाने जातीने लक्ष घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे असे निवेदनात म्हटले आहे. कारण गोर गरीबांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहे. त्यामुळे गावात शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी दारू विक्रेत्यावर कोणतेही अंकुश नसल्यामुळे हम करे सो कायदा अशा परिस्थितीत दादागीरी व हुकुमशाही चालत आहे.या वेशनाला तरुण पिढीतील तरुण वर्ग १६ वर्षाचे ते ५० वर्षापर्यंतचे नागरीक दारूच्या आहारी गेलेले आहेत. व उघड्या डोळ्यांनी पाहू शकता या गावठी दारूमुळे व देशी दारूमुळे अनेकांना स्वतः चे जिव गमवावे लागले आहे. आणि त्यांची धर्म पत्नी ह्या सुद्धा विधवा झालेल्या आहेत. उर्वरीत पिढी ही सुद्धा या गावठी देशीच्या आहारी जाऊन ते आज रोजी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता सकाळ पासून ते सांयकाळ पर्यंत दारू च्या आहारी जात आहेत असे कळेना की ना रात्रीचे दोन वाजले ते कळेना अश्या परिस्थितीत आहारी गेलेले आहेत.तरी ठाणेदार साहेबांनी या संपुर्ण बाबीचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे. दारू विक्री बंद करून आम्हा महिला जिवन जगण्याचा अधिकार सक्षमपणे करून द्यावा आणी उपरोक्त करावे अशी विनंती देखील केली आहे. गावठी दारू विक्री करणारे व वरळी मटका यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दारू विक्रेते १) उत्तम कनिराम चव्हाण २) ज्सोत्सना राजु राठोड ३)गुडी रमेश चव्हाण,४) वच्छला विनोद जाधव,५) शशिबाई सिताराम जाधव,६) वनिता राजेश चव्हाण,७) गंगा गणेश जाधव,८) सुभाष मधुकर राठोड हे सर्व गणुनाईक तांडा येथील रहिवासी विक्रेते (रामनगर) १) शेषराव गुलाब पवार (२) विनोद फतु चव्हाण(३) एकनाथ कृका राठोड(४) कपील राठोड(५) पानाबाई माणीक आडे(६) जिजा आंबादास राठोड हे रामनगर येथील विक्रेते (नंदपूर) नामदेव झिता जाधव (२) मोहन सकृ राठोड (३) कलीबाई देवसिंग पवार (४) सुनिता पवार(५) मोहन बालम राठोड (७) पुर्णाबाई ब्रदी राठोड हे सर्व दारू विक्रीते असून यांची त्वरीत दारू बंद करून कायम स्वरूपी बंद करण्यात यावी अन्यथा महिलांना न्याय न मिळाल्यास मोहा ई येथील पुरुष वर्ग मुंडण करूण लोकशाही मार्गाने उपोषणास बसावे लागेल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदन देते वेळी खालील प्रमाणे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या शांताबाई निवृती मनवर, आम्रपाला विनोद बरडे विशाखा भारत कांबळे पुष्या संदीप बरडे सुनिता सुभाष बरडे शालीनी अमोल मनवर रेखा दादाराव मनवर संघप्रीया राजु जोगंदडे, अरुणा जगदीश पाईकराव, मंगला लहु यमगीर, सितल बाळू जमधाडे, अरुणा बुगाजी जमधाडे, लक्ष्मीबाई कुवा जमधाडे, अनुसया गिर्धर कांबळे, बेबी जयवंता बरडे, शितल अजय मनवर व इत्तर इत्यादी महीलानी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

No comments: