भोसले मारहाण व धमकी प्रकरणत एस एस यांच्या गॅंगच्या दोघांना अटक: जुना राजवाडा पोलिसांकडून दोघांना अटक, माजी जिल्हाप्रमुखांसह इतर संशयितांचा शोध सुरू
भोसले मारहाण व धमकी प्रकरणत एस एस यांच्या गॅंगच्या दोघांना अटक: जुना राजवाडा पोलिसांकडून दोघांना अटक, माजी जिल्हाप्रमुखांसह इतर संशयितांचा शोध सुरू
प्रतिनिधी:रहिम पिंजारी.
---------------------------
कोल्हापूर:भोसले मारहाण आणि धमकी प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले असून जुना राजवाडा पोलिसांनी या प्रकरणातील दोघा संशयितांना नुकतेच ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे कोल्हापूरच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.काय आहे प्रकरण?काही दिवसांपूर्वी पीडित भोसले यांच्यावर गंभीर स्वरूपाची मारहाण झाली होती. या घटनेनंतर, मारहाण झालेल्या भोसले यांच्या पत्नीने (शक्ती विक्रम भोसले) थेट जुना राजवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) माजी जिल्हाप्रमुख रविकरण इंगवले यांच्यासह अन्य दहा जणांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. आरोपींनी घरात किंवा कार्यालयात बोलावून "पतीला जिवंत सोडणार नाही" अशी गंभीर धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.पोलिसांची कारवाई आणि पुढील तपास:या तक्रारीची दखल घेत जुना राजवाडा पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवली आहेत. या प्रकरणातील मुख्य संशयितांच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली असून, नुकतेच दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. रविकरण इंगवले आणि इतर उर्वरित संशयित आरोपींचा शोध पोलिसांकडून अद्याप सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

No comments: