दहीहंडी कार्यक्रमात डॉल्बीचा दणका महागात!; सांगलीत आयोजकांसह चौघांवर गुन्हा दाखल.
दहीहंडी कार्यक्रमात डॉल्बीचा दणका महागात!; सांगलीत आयोजकांसह चौघांवर गुन्हा दाखल.
-----------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
सांगली प्रतिनिधी
राजू कदम
-----------------------------------
सांगली शहरातील तरुण भारत स्टेडियम येथे झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात शासनाच्या बंदी आदेशाचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात डॉल्बी वाजवल्याप्रकरणी आयोजक, डॉल्बी मालक, ऑपरेटर आणि जनरेटर मालक अशा चौघांवर सांगली शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
६ सप्टेंबर रोजी साथीदार युथ फाऊंडेशनच्या वतीने आयोजित दहीहंडी कार्यक्रमात पोलिसांनी आवाज कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्या सूचनांकडे दुर्लक्ष करून डॉल्बी सुरूच ठेवल्याने मुकुंद विश्वास कांबळे (आयोजक), चंद्रसेन सव्वाशे (डॉल्बी मालक), शांतीनाथ संजय उळागड्डे (ऑपरेटर) आणि अमोल जयसिंग पाटील (जनरेटर मालक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६८/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम २२३ व २९२ अंतर्गत नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार जयवंत येसादे करीत आहेत.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून सण-उत्सवात ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांवर अशीच कडक कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

No comments: