Header Ads

महावितरण शाहूवाडी उपविभागाचा उपक्रम; कोपर्डे येथे शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्वावर शेतीपंप कपॅसिटर जोडणी.

 महावितरण शाहूवाडी उपविभागाचा उपक्रम; कोपर्डे येथे शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्वावर शेतीपंप कपॅसिटर जोडणी.

-------------------------------------

शाहूवाडी प्रतिनिधी 

 आनंदा तेलवणकर

मो.9404477703

-------------------------------------

शाहुवाडी : महावितरणच्या कोल्हापूर ग्रामीण-१ विभागांतर्गत शाहूवाडी उपविभागामार्फत कोपर्डे गावातील १०० केव्हीए रोहित्रावरील शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्त्वावर महावितरण शाहूवाडी उपविभागातील उपकार्यकारी अभियंता यांनी स्वखर्चाने जनजागृती साठी शेतीपंप कपॅसिटर जोडून देण्यात आले. शेतीपंपाची कार्यक्षमता वाढविणे, पॉवर फॅक्टरमध्ये सुधारणा करणे तसेच विद्युत प्रणालीवरील अनावश्यक भार कमी करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी *कार्यकारी अभियंता, कोल्हापूर ग्रामीण-१ विभाग, श्री. अजित अस्वले साहेब यांनी शेतीपंपासाठी योग्य क्षमतेच्या कपॅसिटरचे महत्त्व व त्याचे फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगितले. कपॅसिटरमुळे मोटारीस आवश्यक असलेली रिअॅक्टिव्ह पॉवर स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्यास मदत होते. त्यामुळे पॉवर फॅक्टर सुधारण्यास, विद्युत प्रवाह कमी करण्यास, केबल व विद्युत उपकरणांवरील भार कमी करण्यास तसेच वितरण प्रणालीतील विद्युत हानी कमी करण्यास मदत होते. परिणामी शेतीपंपाची विद्युत प्रणाली अधिक कार्यक्षमतेने चालण्यास सहाय्य होते.

शाहूवाडी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. प्रवीण कुंभारे साहेब यांनी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतीपंपांना योग्य क्षमतेचे कपॅसिटर बसवून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

या वेळी शाखाधिकारी श्री. रोहित कातकर व त्यांच्या टीमने प्रत्यक्ष शेतीपंपावर कपॅसिटर बसवून त्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. कपॅसिटर बसविण्यापूर्वी श्री नामदेव चौगुले याच्या 7.5 Hp शेतीपंपाचा लोड करंट १० अँपिअर होता, तर कपॅसिटर बसविल्यानंतर तो ८ अँपिअर इतका झाल्याचे प्रत्यक्ष मोजमापाद्वारे दाखविण्यात आले. 20 टक्के विजेची बचत झाल्याचे नोंद झाली. या प्रात्यक्षिकामुळे कपॅसिटरच्या वापरामुळे विद्युत प्रवाहात होणारी घट व पॉवर फॅक्टर सुधारण्याचे महत्त्व शेतकऱ्यांना प्रत्यक्ष समजावून सांगण्यात आले. या रोहित्र वरील सर्व 10 शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्वावर महावितरण तर्फे कपॅसिटर* बसवून देण्यात आले.

कपॅसिटर बसवल्यामुळे केवळ लोड करंट कमी झाला म्हणून वीजबिलात त्याच प्रमाणात बचत होते, असे नसून त्याचा प्रमुख लाभ पॉवर फॅक्टर सुधारणा, विद्युत प्रणालीवरील भार कमी करणे आणि वितरण व्यवस्थेची कार्यक्षमता वाढविणे हा आहे, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

महावितरण कोल्हापूर ग्रामीण-१ विभागाच्या शाहूवाडी उपविभागाच्या* या प्रायोगिक उपक्रमाचे कोपर्डे येथील शेतकऱ्यांनी स्वागत केले असून, योग्य क्षमतेचे कपॅसिटर वापरण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होण्यास या उपक्रमामुळे निश्चितच मदत होणार आहे. यावेळी कोपर्डे येथील शेतकरी श्री. नामदेव चौगुले, रंगा सुतार, दगडू सुतार, मनोहर चौगुले, सुनील चौगुले, संभाजी चौगुले उपस्थित होते.


तसेच शाखा कार्यालय मलकापूर येथील जनमित्र सुशांत हेगडे लाइनमन, श्रीकांत पाटील, सुधीर कुंभार, राम घेवदे, प्रकाश जाधव, रोहित पाटील, हर्षद भोसले यांनी प्रत्यक्ष कपॅसिटर बसविले

No comments:

Powered by Blogger.