नवरात्रीच्या स्वागतासाठी ग्रामस्थ सरसावले ; लक्ष्मी-मरगुबाई मंदिर परिसर चकाचक.
नवरात्रीच्या स्वागतासाठी ग्रामस्थ सरसावले ; लक्ष्मी-मरगुबाई मंदिर परिसर चकाचक.
----------------------------------
कसबा वाळवे, प्रतिनिधी
विजय बकरे
----------------------------------
राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील लक्ष्मी-मरगुबाई मंदिर परिसरात ग्रामस्थांच्या पुढाकारातून , नवरात्र उत्सव व घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसर स्वच्छ, सुंदर व भक्तिमय वातावरणात राहावा, या उद्देशाने ग्रामस्थांनी एकजुटीने श्रमदान केले.
नवरात्रोत्सवात मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी वर्दळ असते. त्या पार्श्वभूमीवर परिसरातील वाढलेले गवत, पालापाचोळा, कचरा व अनावश्यक वस्तू हटवून मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. ‘देवस्थानाची स्वच्छता ही आपली सामूहिक जबाबदारी’ या भावनेतून ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या ग्रामस्थांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
या मोहिमेत ग्रा.पं. सदस्य सचिन फराकटे, सामाजिक कार्यकर्ते युवराज पोवार, चंद्रकांत उपाध्ये, सिताराम पाटील, एस. टी. भांदिगरे, दत्तात्रय भांदिगरे,जीवन भांदिगरे संतोष पाटील, रविकिरण पाटील, बाबुराव पाडळकर, लालू भांदिगरे, राम पाटील, उदय पाटील, अमोल पाटील, योगेश पाटील, केसरकर मामा, व पिंटू पाटील यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.

No comments: