Header Ads

सम्यक बुद्ध विहार येथे वर्षावास समाप्तीनिमित्त भोजनदान कार्यक्रम उत्साहात संपन्न!

 सम्यक बुद्ध विहार येथे वर्षावास समाप्तीनिमित्त भोजनदान कार्यक्रम उत्साहात संपन्न!

 कोजागिरी पौर्णिमेनिमित्त खीरदान; ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथाच्या वाचनाचा सांगता समारोप.

✍🏻 सिध्दार्थ कदम

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी


उमरखेड : - शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड येथील आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सम्यक बुद्ध विहार येथे वर्षावास समाप्तीनिमित्त भोजनदान कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यानिमित्ताने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या वाचनाचा सांगता समारोप करण्यात आला.

दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने सम्यक बुद्ध विहार परिसरात खीरदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सव दिनी डान्स स्पर्धा आणि संगीत खुर्ची स्पर्धेतील सर्व स्पर्धकांना वही,पेन,पुस्तक, कंपास देऊन विद्यार्थ्यां स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी वर्षावास समाप्ती समारोपानिमित्त भोजनदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या दोन्ही कार्यक्रमांना विविध मान्यवरांसह उमरखेड शहरातील आंबेडकरी समाजबांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमाचे आयोजन ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सव समिती, रमा माता महिला मंडळ आणि सम्यक बुद्ध विहार समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड, उमरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे अध्यक्ष पत्रकार सिध्दार्थ दिवेकर, संतोष इंगोले, तुषार पाईकराव, गौतम दिवेकर, प्रफुल दिवेकर, आकाश श्रवले, उषाताई इंगोले, हिराबाई दिवेकर, बेबाबाई गवंदे मायाबाई पाईकराव,आनंदाबाई दिवेकर, शांताबाई दिवेकर, भारताबाई दिवेकर, भारतीताई केंद्रेकर, उज्वला धबाले, राखी धबाले आदींनी परिश्रम घेतले.

बौद्ध धम्मातील विचारांचे आचरण, ग्रंथवाचनातून प्रबोधन आणि भोजनदानातून सामाजिक एकोपा वृद्धिंगत करण्याचा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला. दोन्ही कार्यक्रमांना मिळालेल्या प्रतिसादामुळे आयोजकांनी समाधान व्यक्त केले.

No comments:

Powered by Blogger.