Header Ads

कुरूलच्या तरुणाची जिद्द; युनिक गोट फार्म ठरतोय आदर्श..

 कुरूलच्या तरुणाची जिद्द; युनिक गोट फार्म ठरतोय आदर्श..

पुणे (प्रतिनिधी )पुण्यातील नोकरीला रामराम ठोकून मोहोळ तालुक्यातील कुरूल येथील रहिवाशी राहील इम्तियाज तांबोळी यांनी शेळीपालनातून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांचा युनिक गोट फार्म आज परिसरात आकर्षण ठरत आहे.

मर्यादित भांडवल आणि योग्य वंशावळीची निवड करून त्यांनी हा फार्म उभारला आहे. दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करून इतरांना रोजगार द्यावा, या उद्देशाने त्यांनी हा निर्णय घेतला.

आधुनिक पद्धतीने उभारलेल्या या फार्ममध्ये शास्त्रीय संगोपन आणि ब्रीडिंग व्यवस्थापनावर भर दिला जातो. योग्य नियोजन केल्यास एका शेळीपासून १४ ते १५ महिन्यांत ५० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.

ग्रामीण तरुणांसाठी हा व्यवसाय रोजगाराचा नवा राजमार्ग ठरत आहे.

No comments:

Powered by Blogger.