Header Ads

राजारामपुरी पोलिसांनी मटका मालकावर केली संघटित गुन्हेगारीची (MCOCA धर्तीवर BNS कलम ११२) मोठी कारवाई; कल्याण मटका चालवणाऱ्या दोन आरोपींना अटक. .

राजारामपुरी पोलिसांनी मटका मालकावर केली संघटित गुन्हेगारीची (MCOCA धर्तीवर BNS कलम ११२) मोठी कारवाई; कल्याण मटका चालवणाऱ्या दोन आरोपींना अटक.

प्रतिनिधी रहिम पिंजारी.

-----------------------------

कोल्हापूर: राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने जुगार (मटका) व्यवसायाविरुद्ध एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. यादव नगर परिसरातील शासकीय शौचालयाच्या बाजूला सुरू असलेल्या कल्याण मटका अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी एका एजंटसह मुख्य मटका मालकाला अटक केली आहे.

या प्रकरणात मुख्य मटका मालक रवींद्र महादेव चव्हाण (वय ४०, रा. विजय बेकरी समोर, दौलतनगर, राजारामपुरी) याच्यावर यापूर्वी तब्बल १५ जुगाराचे गुन्हे दाखल असल्याने, त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) चे कलम ११२ (संघटित गुन्हेगारी) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

कारवाईचा तपशील:

१९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २:१० वाजण्याच्या सुमारास डवरी वसाहत, यादव नगर येथील एका सरकारी शौचालयाच्या बाजूला उघड्यावर हा मटका अड्डा सुरू होता. पोलीस अंमलदार विशाल बाळकृष्ण खराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा (गु.र.नं. ५१४/२०२६) दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी:

१) प्रशांत उदय गायकवाड (वय ३२, रा. डवरी वसाहत, यादवनगर, करवीर, जि. कोल्हापूर) – (मटका एजंट)

२) रवींद्र महादेव चव्हाण (वय ४०, रा. दौलतनगर, राजारामपुरी) – (मुख्य मटका मालक)

जप्त केलेला माल:

पोलिसांनी कारवाई दरम्यान घटनास्थळावरून ३,५३०/- रुपये रोख रक्कम आणि मटक्याचे आकडे लिहिलेले बुक्स व चिठ्ठ्या जप्त केल्या आहेत.

संघटित गुन्हेगारीचे कलम वाढवले:

तपासादरम्यान निष्पन्न झाले की, आरोपी क्र. १ (प्रशांत गायकवाड) हा एजंट म्हणून काम करत होता आणि तो मुख्य मालक रवींद्र चव्हाण याच्या फायद्यासाठी व सांगण्यावरून लोकांकडून पैसे घेऊन कल्याण मटका जुगार चालवत होता. आरोपी रवींद्र चव्हाण याच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वी एकूण १५ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्या संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांकडून भारतीय न्याय संहिता कलम ११२ लागू करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता.

पोलीस उपअधीक्षक (शहर विभाग, कोल्हापूर) श्रीमती प्रिया पाटील मॅडम यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर, या गुन्ह्यात कलम ११२ चा समावेश करून मुख्य आरोपी रवींद्र चव्हाण याला अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अण्णासाहेब जाधव सर, पोलीस उपअधीक्षक श्रीमती प्रिया पाटील मॅडम, पोलीस निरीक्षक श्री. विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपेष इंगळे आणि राजारामपुरी पोलीस अंमलदारांच्या पथकाने केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेष इंगळे करत आहेत.

No comments:

Powered by Blogger.