भ्रष्टाचाराविरोधात कोल्हापूर ACB मैदानात! जिल्हाभर जनजागृतीचा धडाका; लाच मागणाऱ्यांची तक्रार थेट १०६४ वर करा!
भ्रष्टाचाराविरोधात कोल्हापूर ACB मैदानात! जिल्हाभर जनजागृतीचा धडाका; लाच मागणाऱ्यांची तक्रार थेट १०६४ वर करा!
महाविद्यालयांपासून शासकीय कार्यालयांपर्यंत पोहोचला दक्षता जनजागृती सप्ताह; महिला बचत गट, उद्योजक आणि नागरिकांमध्ये प्रबोधन.
कोल्हापूर | प्रतिनिधी
शासकीय कामासाठी कोणी लाच मागत असेल, तर आता गप्प बसू नका! भ्रष्टाचाराविरोधात नागरिकांनी निर्भयपणे पुढे यावे, या उद्देशाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूरने जिल्हाभर जनजागृतीचा धडाका लावला. केंद्रीय सतर्कता आयोगाच्या निर्देशानुसार २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित दक्षता जनजागृती सप्ताहात जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले.

No comments: