Header Ads

समान काम समान वेतनासाठी सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे आंदोलन; मुख्यमंत्र्यांना निवेदन.

समान काम समान वेतनासाठी सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे आंदोलन; मुख्यमंत्र्यांना निवेदन.

पी. एन. देशमुख, जिल्हा प्रतिनिधी

अमरावती


बहुजन हिताय सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचारी संघटना, अमरावती जिल्हा यांच्या वतीने उच्च न्यायालय, मुंबई येथील कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील सर्व जिल्हा न्यायालयातील कर्मचाऱ्यांना *“समान काम समान वेतन”* या धर्तीवर सन २००६ पासून वेतन मंजूर करण्याबाबत मा. मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना मार्फत मा. जिल्हाधिकारी साहेब, अमरावती यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायालयीन कर्मचारी यांचे साठी मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी प्रस्तावित केलेल्या वेतनवाढ प्रस्तावास शासन दरबारी होत असलेल्या दिरंगाईचे अनुषंगाने न्यायालयीन कर्मचारी यांनी सुरू केलेल्या आंदोलनास जाहीर पाठिंबा दर्शवून बहुजन हिताय सेवा निवृत्त न्यायालयीन कर्मचारी संघटना, अमरावती, दिनांक १०/१०/२०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (इर्विन चौक), जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे एक दिवस धरणे आंदोलन संपन्न झालेले आहे.

समान काम समान वेतन” सन २००६ पासून या मागणीसाठी महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्याकरिता दि. ०४/११/२०२६ रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत जिल्हाधिकारी अमरावती यांचे कार्यालयासमोर एक दिवसाचे साखळी उपोषण करून हिताय सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचारी संघटना अमरावती यांची महिन्यातील मासिक सभा करण्यात आली.

परतु वरील चारही संघटना अमरावती यांनी दि. ०३/१२/२०२६ रोजी जागृती ऑनलाईन मिटिंग घेतली. त्या मिटिंगमध्ये असे ठरविण्यात आले की, दि. ०५/१२/२०२६ रोजीचे सामूहिक रजा आंदोलन व सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचारी यांचे साखळी उपोषण तूर्त पुढे ढकलण्यात आले आहे.

No comments:

Powered by Blogger.