Header Ads

माणुसकीची भिंत सोशल फॉउंडेशन द्वारा संचालित 'शांताई ' बेघर निवारा केंद्राचे भुमी पूजन समारंभ संपन्न

 माणुसकीची भिंत सोशल फॉउंडेशन द्वारा संचालित 'शांताई ' बेघर निवारा केंद्राचे भुमी पूजन समारंभ संपन्न

सिद्धार्थ कदम

पुसद तालुका प्रतिनिधी

आज दिनांक 15 नोव्हेंबर रोजी  'शांताई ' बेघर निवारा केंद्राचा भुमी पुजन समारंभ संत गाडगे बाबा स्मृति स्थळ जाधव बाग पार्डी रोड निंबी येथे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाकरिता व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते मनीषभाऊ शाह, मानव सेवा समितीचे अध्यक्ष श्री दीपक आसेगांवकर, विश्वनाथ सिंह बयास पतसंस्थेचे अध्यक्ष निशांत बयास,सप्तखंजिरी वादक व प्रबोधनकर पंकजपाल महाराज, शैक्षणिक व सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर प्रा. प्रेमभाऊ राठोड, शेतीनिष्ठ शेतकरी दत्तात्रय जाधव,श्री विनोद टेहरे  साहेब, मातोश्री वृदद्धाश्रमाचे अध्यक्ष श्री नागपुरे पत्रकार ललित सेता हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा, उलगुलानचे जनक, 'धरती आबा ' बिरसा मुंडा व स्व. सौ शांताई जाधव यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. नंतर सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते व सर्व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये नियोजित 'शांताई ' बेघर निवारा केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी बोलतांना श्री दीपक आसेगांवकर यांनी माणुसकीची भिंतीच्या कार्याची स्तुती केली. माणुसकीची भिंतच हे कार्य उत्तमरित्या पार पाडू शकेल यामध्ये कोणतीही शंका नाही असेही ते म्हणाले. माणुसकीची भिंतीच्या कार्याची संपूर्ण माहिती श्री पंकजपाल महाराज यांनी दिली. या बेघर निवारा केंद्राला 6 हजार स्कवेअर फूट जागा भिंतचे अध्यक्ष गजानन जाधव यांनी त्यांच्या शेतामध्ये जागा विनामूल्य दिली.त्याच प्रमाणे खालील मान्यवरांनी देणगी जाहीर केली.

'सतीशभाऊ बयास यांचे स्मृति प्रित्यर्थ ' श्री मनीष शाह मित्र मंडळा तर्फे 111111 रुपये. ऍड. विवेक टेहरे व श्री विनोद टेहरे यांचे तर्फे  100000 रुपये. दत्तात्रय बापूराव जाधव यांचे तर्फे 51000 रुपये श्री दिपकभाऊ आसेगावकर यांचे तर्फे 31000 रुपये.माणुसकीची भिंत 21000 रुपये 

श्री शिवरामजी शेट्टे यांचे तर्फे 21000 रुपये मिशन ग्रीन बहुउद्देशीय संस्था 11000 रुपये श्री यश गोपाल कोहरे 11000 रुपये यवतमाळ येथील श्रम संस्कार पुरस्काराची रक्कम 11000 रुपये श्रीमती शालिनीताई उद्देपूरकर यांचे तर्फे 11000 रुपये,स्व. शांताबाई दत्तात्रय जाधव यांच्या गोड जेवणाचे 6900 रुपये.मोहनलाल शांताबाई राठी चॅरेटेबल ट्रस्ट यवतमाळ यांचे तर्फे 5100 रुपये रुग्णमित्र फॉउंडेशन 5001 रुपये..प्रा. महादेव सखाराम गावंडे 5000 रुपये स्वर्गीय सखाराम गावंडे यांचे स्मृति प्रित्यर्थ.सुपर कॅन्स्टशन कंपनी नागपूर श्री के. एन. पटेल यांच्याकडून मदत करण्याचे आव्हान करण्यात आले  निवारा केंद्राच्या बांधकामा करिता लागणारे सिमेंटचे ब्लॉक ना नफा ना तोटा या तत्वावर श्री राजूभाऊ पालिकोंडावर यांचे तर्फे.

संपूर्ण वास्तू रचना आराखडा निशुल्क श्री लुकेशभाऊ पोरकुटे हे करून देणार.

अत्यंत कमी नफ्यामध्ये बांधकाम श्री आकाशभाऊ शिंदे (ठेकेदार ) हे करून देणार आहेत. या सर्व दात्यांचे आभार भिंतीचे अध्यक्ष गजानन जाधव यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिशन ग्रीन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रमेश डंबोळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सप्तखंजिरी वादक श्री पंकजपाल महाराज यांनी केले...

या प्रसंगी बद्रीनाथ विश्वनाथ गावंडे, नंदकुमार देविदास खैरे विठ्ठल शेवाळे, मधुकर श्रीराम चिंतावार प्रकाश येल्हेकर ,बाबाराव शेषेराव अंभोरे, दीपक सदाशिव अंमोरे, ज्ञानेश्वर सुभाष पैठणकर, नयनकुमार रामधनी रामचंद्र बापूजी जाधव प्रकाश भाऊराव चोपडे ,साई संगमनाथ वट्टमवार, दिगंबर संभाजी देशमुख ,प्रताप दादाराव पतंगे, प्रभाकर शिवाजीराव टेटर, हरगोविंद उत्तमराव कदम, भाऊराव मारोतराव भोयर, प्रवीण गजानन गोरे, संतोष लक्ष्‍मण अंभोरे, राधेश्याम मदनलालजी जांगिड, सुरेंद्रसिंह राठोड, मुरलीधर ढगे, शिवराम शेट्टे, शेरखान बाबा खान पठाण, दादाराव विठ्ठलराव ढेकळे, राजेश विलासराव पलीकोंडावार, देविदास तुकाराम राठोड, गणेश प्रकाश सावंत, पंजाबराव विठ्ठलराव ढेकळे, अमोल विश्वनाथ गंगोत्री, प्रभाकर विठ्ठलराव पाटील, विठ्ठल मारुती जाधव, अरुण दत्तात्रय नागुलकर, लोकेश वाकोडे, अनंता  चतुर ,प्रमोद ठाकूर, जय जाधव, विनोदराव टेहरे, माणुसकीच्या भिंतीचे अध्यक्ष गजानन जाधव, मिशन ग्रीन अध्यक्ष रमेश डंबोळे, रुग्ण मित्र फाउंडेशन चे अध्यक्ष शांतीसागर इंगोले, नाम फाउंडेशन चे अध्यक्ष स्वप्निल देशमुख, सुंदरा बहुउद्देशीय संस्था चे अध्यक्ष अमोल गंगात्रे नितीन चव्हाण व निंबी पार्डी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते....

No comments:

Powered by Blogger.