Header Ads

चनगोंडा पाटील हनुमान दूध संस्थेचे उच्चांकी बोनस वाटप.,,.


चनगोंडा पाटील हनुमान दूध संस्थेचे उच्चांकी बोनस वाटप.,,.

दत्तवाड प्रतिनिधी :- (अर्जुन धोंडीराम धुमाळे )

 चनगोंडा क.पाटील हनुमान दूध व्यावसायिक संस्था मर्यादित दत्तवाड च्या वतीने यंदाही उच्चांकी दूध फरक बिल बोनस व भेट वस्तू वाटप करण्यात आले. यावर्षीच्या दुष्काळी पार्श्वभूमीचा विचार करून,  गोकुळ दूध संघाकडून अत्यल्प बोनस मिळाले असूनही. 

संस्थेकडून

 म्हैस दुधाला 

9.50 % 

व गाय दुधाला 6 % प्रमाणे  स्वतःची 4,21,307 ₹ रुपये रक्कम घालून

एकूण 9,18,347  ₹

रुपये. फरक बिल बोनस व भेटवस्तू ब्लॅंकेट  देण्यात आले. दिवाळीनिमित्त बोनस  व भेटवस्तू वाटप कार्यक्रमानिमित्त संस्थेचे चेअरमन बाबासो आण्णासो पाटील यांनी गेल्या दोन वर्षापासून  सुरू केलेल्या हायस्ट दूध पुरवठा केलेल्या गाय विभाग व म्हैस विभागातील प्रथम क्रमांक 

3000,

 द्वितीय क्रमांक 2000,

तृतीय क्रमांक1000 रुपये  बक्षीस रक्कम ही देण्यात आली.

 व संस्थेच्या वतीने  सातत्याने राबविल्या जाणाऱ्या इतर अनेक सुविधा, सेवा ही चोख व प्रामाणिकपणे देण्याची ग्वाही दिली. यावेळी सर्वप्रथम संस्थेचे संस्थापक, माजी जिल्हा परिषद सदस्य कै. चनगोंडा पाटील यांच्या प्रतिमेचे व हनुमान, रेणुका,पूजन करण्यात आले.

 स्वागत प्रास्ताविक कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा 

श्री राजगोंडा पाटील यांनी केले.   संस्थेच्या सभासदांनी संस्थेच्या सर्वोत्तम सेवा, उत्कृष्ट प्रामाणिक कार्य, पारदर्शक कारभार, याबद्दल  गौरवोद्गार काढून संस्थेचे कौतुक केले. संचालक अशोक पाटील यांनी मनोगत व तेजस वराळे यांनी आभार मानले यावेळी संचालक प्रकाश पाटील,दौलत माने,माजी सरपंच आण्णासाहेब पाटील, सागर झुणके,

 बसगोंडा नुले, सिद्धगोंडा पाटील, , संपत्ती खेमलापुरे, 

 सचिव महादेव मटाले, रामगोंडा पाटील,

 संस्थेचे दूध उत्पादक सभासद, शेतकरी, ग्रामस्थ, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.