Header Ads

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचा कोल्हापुरात संघटनात्मक विस्तार; १३ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर!

 महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचा कोल्हापुरात संघटनात्मक विस्तार; १३ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर!

पश्चिम महाराष्ट्रापासून शहर व जिल्हास्तरापर्यंत नवी कार्यकारिणी; नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण.


कोल्हापूर | प्रतिनिधी

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या संघटनात्मक विस्ताराला कोल्हापुरातून नवी दिशा मिळाली आहे. रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी बावडा येथील अलंकार हॉलमध्ये संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत संघटनेच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेण्याबरोबरच आगामी वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. याचवेळी संघटनेच्या विस्तारासाठी विविध स्तरांवरील १३ नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.

 बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल (IPS) उपस्थित होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले होते.

बैठकीत संघटनेच्या मागील कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच संघटनेची ताकद वाढविणे, नव्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संघटनात्मक कार्याला गती देणे आणि आगामी काळातील कार्याची दिशा निश्चित करणे यावर चर्चा करण्यात आली.

नव्या नियुक्त्यांमुळे संघटनेला बळ

संघटनेच्या विस्ताराच्या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्र, जिल्हा, शहर, युवा आणि महिला विभागांमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी सादिक अब्दुल्ला अत्तार, उपाध्यक्षपदी दीपक संजय मुळीक यांची नियुक्ती करण्यात आली.

कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी चारुदत्त हिंदुराव नाईक, उपाध्यक्षपदी प्रदीप आण्णापा कांबळे, सचिवपदी संतोष प्रभाकर पोवार यांची निवड करण्यात आली.

शहर अध्यक्षपदी प्रथमेश बाबासाहेब पाटील, उपाध्यक्षपदी गिरधर अनिल पाटील, तर सचिवपदी सुशांत बाबासो पाटील यांची नियुक्ती झाली.

युवा अध्यक्षपदी अभय नंदकिशोर कराड, उपाध्यक्षपदी हर्ष राम कोळी, तर सचिवपदी रोहित तात्यासो कांबळे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली.

महिला विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी राणी जयराम खंडागळे, तर जिल्हा उपाध्यक्षपदी शुभदा विजयकुमार माने यांची नियुक्ती करण्यात आली.

नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. उपस्थितांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष राहुल दुबाले आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. बाहेरगावाहून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याबद्दल संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

नवीन नियुक्त्यांच्या माध्यमातून संघटनेचे जाळे अधिक व्यापक करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

No comments:

Powered by Blogger.