खाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेस विक्रमी 1 कोटी 60 लाखावर नफा.
खाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेस विक्रमी 1 कोटी 60 लाखावर नफा.
--------------------------------------------------------------------------------
चेअरमन महादेव डावरे यांची माहिती
कोल्हापूर ..खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेला अहवाल सालात १ कोटी६० लाख रु. नफा झाला असून त्यातून सभासदांना ४0 टक्के लांभाश देणार असलेची घोषणा पतसंस्थेचे चेअरमन महादेव डावरे यांनी केली . ते पतसंस्थेच्या 29 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलत होते. ही सर्वसाधारण सभा श्रीराम सोसायटी क॥ बावडयाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात व शांततेत संपन्न झाली.
पतसंस्थेचे संस्थापक भरत रसाळे व संचालक मंडळाच्या हस्ते दीप प्रज्यलन करून सभेस सुरवात झाली.
पतसंस्थेच्या कामकाजाचा आढावा घेऊन माहिती देतांना चेअरमन महादेव डावरे म्हणाले की, संस्थेने चालू साली ३५० कोटीची उलाढाल केली असून संस्थेला अहवाल सालात एक कोटी साठ लाख इतका विक्रमी नफा झाला आहे.त्यांतून सभासदांना १५ टक्के डिव्हिडंड व सभासद भेट म्हणून २५टक्के असा एकूण ४० टक्के लाभांश देण्यात येणार आहे. तसेच सभासदाला देण्यात येणाऱ्या कर्जाच्या व्याजदरांत कपात केली असून सभासदांना पवणेदहा टक्के दरांने ४५लाख कर्ज देण्यात येईल. असे सांगून सभासदांनी पतसंस्था राबवित असलेल्या विविध उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले . संस्थेचे संस्थापक भरत रसाळे यांनी सभासद कर्ज मुक्ती योजना व संस्थेच्या मालकीच्या ' शिक्षक सभागृह ' उभारणी बाबत मार्गदर्शन केले . प्रास्ताविक व स्वागत ज्येष्ठ संचालक शिवाजी भोसले यांनी केले
सभेच्या कामकाजात भाग घेताना संतोष आयरे, राजेंद्र कोरे, एस डी कासार, टी आर पाटील, दशरथ कांबळे, शिवाजी सोनाळकर, गोरख वातकर, इत्यादी सभासदांनी मयत सभासद कर्जमुक्ती योजना, पतसंस्थेचे स्वतःचे सभागृह, विद्यार्थ्यासाठीस्कॉलरशीप परीक्षा अशा बाबी आमलांत आणणेसाठी मौलिक सूचना केला. त्याचे स्वागत संचालक मंडळाने केले.
यावेळी संस्थापक भरत रसाळे, चेअरमन महादेव डावरे, व्हा. चेअरमन बालीशा लंबे, सचिव सारिका पाटील,ज्येष्ठ संचालक आनंदा हिरुगडे, शिवाजी भोसले, संचालक सर्वस्वी राजेश कोंडेकर, राजाराम हुल्ले, कुमार पाटील, विकास कांबळे, चंद्रकांत पाटील, सूर्यकांत बरगे, सौ छाया हिरुगडे सल्लागार समिती सदस्य आनंदा डावरे, यशवंत कोळी, अरुण गोते, व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
नोटीस वाचन सचिव सौ. सारिका पाटील यांनी केले, प्रोसिडिंग वाचन कार्यकारी संचालक सदाशिव साळवी यांनी केले, आभार संचालक विकास कांबळे यांनी मानले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक श्री मच्छिंद्र नाळे यांनी केले.
Comments
Post a Comment