धर्मपुरी येथे बिबट्या आला रे आला यामुळे ग्रामस्थ भयभीत तर माळशिरस वनविभाग व रेस्क्यू टीमच्या ऑपरेशन नंतर सापडला तरस नागरिक झाले भयमुक्त

 धर्मपुरी येथे बिबट्या आला रे आला यामुळे ग्रामस्थ भयभीत तर माळशिरस वनविभाग व रेस्क्यू टीमच्या ऑपरेशन नंतर सापडला तरस नागरिक झाले भयमुक्त

----------------------------------------

 तानाजी सोडमिसे

--------------------------------------

माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी येथे गेले तीन दिवसापासून धर्मपुरी गावाच्या मालकी क्षेत्राच्या परिसरातील राना मधून सदृश्य प्राण्याचे पायाचे ठसे दिसून आल्याने धर्मपुरी परिसरामध्ये ग्रामस्थांमधून बिबट्याचा वावर असल्याचे व बिबट्या आला असल्याचे तीन दिवसापासून कालवा झाल्याने धर्मपुरी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

याबाबत धर्मपुरी ग्रामस्थांनी वनपरिक्षेत्र विभाग माळशिरस यांच्याकडे धर्मपुरी परिसरात बिबट्या अथवा सदृश्य प्राणी फिरत असल्याचे कळविल्याने लागलीच वनपरिक्षेत्र माळशिरस विभागाचे अधिकारी दयानंद कोकरे यांनी सर्व कर्मचाऱ्या सह जाऊन ज्या परिसरात सदृश्य प्राण्याचा वावर असल्याचा सांगण्यात आले त्या परिसरात जाऊन पाहणी केली व सदृश्य प्राण्याचे ठसे मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर ग्रामस्थांना जनावरांना कोणताही धोका होऊ नये म्हणून पिंजरा लावण्यात आला होता. सदृश्य प्राणी पकडण्यासाठी सदर पिंजऱ्यामध्ये तीन कोंबड्या ठेवण्यात आल्या होत्या पण सदर सदृश्य पाण्याच्या पायाला जखम झाल्याने तो पाय चालताना वर असल्याने पिंजऱ्यावर पाय न पडल्याने सदर सदृश्य प्राण्याने पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात आलेल्या तीनही कोंबड्यांचा फडशा पडून तेथून पोबारा केला होता .त्यानंतर व सलग तीन दिवस सदृश्य प्राण्याचा तपास करूनही तो प्राणी सापडत नसल्याने वनपरिक्षेत्र माळशिरस विभागा चे अधिकारी दयानंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती येथील या विभागाची बारामती रेस्क्यू टीम येथे पाचरण करण्यात आली .

ज्या परिसरातील उसामध्ये सदृश्य पाण्याचा वावर आहे त्या ठिकाणी बारामती रेस्क्यू टीमने जाळे लावून तिन्ही बाजूने कालवा चालू केल्याने सदर प्राणी तेथून घाबरून पळून जात असताना तो जखमी अवस्थेत जाळ्यात अडकला असता त्याची वनपरिक्षेत्र विभाग माळशिरस आणि बारामती रेस्क्यू टीमने जाळ्याजवळ जाऊन पाणी केले असता तो बिबट्या नसून ते तरस प्राणी असल्याचे निष्पन्न झाले. त्या तरसाला त्या ठिकाणी भुलीचे इंजेक्शन देऊन जखमी पायावर औषधोपचार करून त्याला पुढील उपचारासाठी पिंजऱ्यात बंदिस्त करून बारामती टीमने ताब्यात घेतले.

सदर तीन दिवसापासून धर्मपुरी परिसरात बिबट्या आल्याचा कालवा झाल्याने पूर्ण गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते पण बिबट्या ऐवजी तरस निघाल्याने धर्मपुरी ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला आहे.

Comments