वीर सावरकर करिअर ॲकॅडमी, कुपवाडच्या प्रशिक्षणार्थीचे मॅरेथॉन स्पर्धेत घवघवीत यश.
वीर सावरकर करिअर ॲकॅडमी, कुपवाडच्या प्रशिक्षणार्थीचे मॅरेथॉन स्पर्धेत घवघवीत यश.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कुपवाड येथील वीर सावरकर करिअर ॲकॅडमीच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थी - विद्यार्थीनींनी गोल्डन जीम सांगली मार्फत आयोजित 3 कि.मी व 5 कि.मी रनिंग स्पर्धा पुर्ण करून घवघवीत यश संपादन केले. त्यामध्ये सुहानी यादव, चित्रगंधा नाईकवडी, ऐश्वर्या गडदे, आदिती साहू, सलोनी चिनमुरे, मनीषा केसकर, सानिका हाक्के, नंदिनी चव्हाण, पुजा मासाळ, श्रद्धा चव्हाण, हर्षदा माळी, प्रतीक्षा नाईक यांनी गोल्ड मेडल प्राप्त करून ॲकॅडमीच्या नावलौकीकात भर घातली.
सर्व विजयी व सहभागी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी – विद्यार्थीनींचा सत्कार वीर सावरकर करियर अकॅडमी चे संस्थापक श्री. आण्णासाहेब उपाध्ये यांचे हस्ते करणेत आला.
प्रशिक्षणार्थीना ॲकॅडमीचे संकल्पक श्री . सूरज उपाध्ये, प्रशिक्षक विठ्ठल शिंदे, शंकर पवार, विद्याधर उपाध्ये, शिरीष चिरमे, कुंदन जमदाडे, अनिल चौगुले, अमोल राठोड यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व विजयी प्रशिक्षणार्थींचे कुपवाड व परीसरातून कौतूक होत आहे.
Comments
Post a Comment