बसरेवाडी ग्राम पंचायतीची तीन वर्ष पिण्याच्या पाण्याची गळती काढण्यात असमर्थता :- गावच्या लोकांच्या आरोग्याशी खेळतायत खेळ.

 बसरेवाडी ग्राम पंचायतीची तीन वर्ष पिण्याच्या पाण्याची गळती काढण्यात असमर्थता :- गावच्या लोकांच्या आरोग्याशी खेळतायत खेळ.

----------------------------------------------------------------------------------------------

----------------------------------------------------------------------------------------------

बसरेवाडी (ता भुदरगड )येथील खडक गल्ली येथे  ग्रामपंचायतीची  गावाला पाणीपुरवठा करणारी मुख्य टाकी आहे, तेथुनच वीस फुट अंतरावर गेली तीन साडेतीन वर्षांपासून मुख्य पाईप लाईन फुटुन मोठी गळती चालू आहे , त्यातुन रोज शेकडो लिटर पाणी वाया जाते. 

 या मुख्य पाईप लाईन मधुनच सपूर्ण गावांला पाणी पुरवठा केला जातो,  याची माहिती  ग्रामपंचायत प्रशासनाला असुन देखील याकडे दुर्लक्ष केले जाते आहे.सदर लिकेज नवीन पाईप लाईन योजना मंजूरीच्या नावाखाली गेली तीन वर्षे नवीन व जुनी अशा दोन पचंबॉड्या झाल्या तरीही हि पाईप लाईन बदलण्यासाठी सदर ग्राम पंचायतीची चाल धकल चालू आहे.

सदर लिकेज मुळे येथील  गल्लीत पाणी सतत  वाहत असते याबद्दल तेथील काही मिळकतधारक व नागरिकांनी लेखी आणि तोंडी ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांना अर्ज केला पण त्याची दखल घेतली गेली नाही.

पण आज रोजी  मोठ्या प्रमाणात पाणी लिकेज मुळे सदर मिळकत धारक याना सतत वाहणाऱ्या पाण्याचा त्रास होऊन डासांचे प्रमाण वाढत आहे तसेच आरोग्य बाबत सर्व कल्पना सरपंच,सर्व सदस्य व ग्रामसेवक  यांना प्रत्येक्षात दाखवुन देण्यात आली पण नवीन योजनेच्या नावाखाली सदर काम करण्याची मानसिकता दाखवून सदर मिळकत धारकांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली . सदर ग्राम पंचायत कडुन गावच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करुन कामे करण्यात येतं असल्याच्या दावा एकीकडे केला जात असताना दूसरीकडे गेली तीन वर्षे गावाच्या मुख्य पाईप लाईनला लागलेली गळती काढण्यात या प्रशासन अपयशी ठरले आहे , तसेच मुख्य म्हणजे सर्व नागरिकांच्या आरोग्याशी ते खेळत आहेत 

 या गळतीबाबत सतत माहिती देणाऱ्या मिळकतधारकांमध्ये एक यशवंत सरपंच पुरस्कार प्राप्त गावातील एक जेष्ठ सरपंच तर दुसरे  एका दैनिकाचे पत्रकार आहेत यांना देखील सरपंच, सदस्य आणि ग्रामसेवक यांनी आजपर्यंत  उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारुन नेली आहे यातुन गावांमधील ग्रामपंचायत प्रशासन चालवणारे किती हुशार आहेत हे दिसून येते.

Comments