अवैध/अनधिकृत होर्डिंग, जाहिरात फलक, बॅनर्स, पोस्टर्सबाबत तक्रारींसाठी टोल फ्रि व व्हॉटसॲप नंबरवर संपर्क साधावा.

 अवैध/अनधिकृत होर्डिंग, जाहिरात फलक, बॅनर्स, पोस्टर्सबाबत तक्रारींसाठी टोल फ्रि व व्हॉटसॲप नंबरवर संपर्क साधावा.


--------------------------------------------------------------------------------

----------------------------------------------------------------------------------

कोल्हापूर ता.23 : शहरातील अवैध/अनधिकृत होर्डिंग, जाहिरात फलक, बॅनर्स, पोस्टर्स, घोषणा फलकबाबत तक्रारींसाठी टोल फ्रि नंबर 18002333568 तसेच एस.एम.एस. करण्यासाठी 9766532032 व व्हॉटसॲप नं.9822598387, 7721875552 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. मा.उच्च न्यायालय येथे दाखल जनहित याचिका क्र.155/2011 चे प्रभाविपणे अमंलबजावणीसाठी वेळो-वेळी कोल्हापूर शहरात अवैध/अनधिकृत होर्डिंग, जाहिरात फलक, बॅनर्स, पोस्टर्स, घोषणा फलक इत्यादी काढण्याची कार्यवाही करीत आहे. सबंधीतावर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांतर्गत तसेच महाराष्ट्र मालमत्ता विरुपणास प्रतिबंध अधिनियम 1995,कलम 3,4 व 7 नुसार कारवाई करुन व मुद्देमाल जप्त करुन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले जातात. त्यानुसार शहरातील अवैध/अनधिकृत होर्डिंग, जाहिरात फलक, बॅनर्स, पोस्टर्स, घोषणा फलक काढण्याची व कायदेशीर कारवाई करण्याची कार्यवाही सुरु आहे. तरी सामान्य.


नागरीकांनी आपल्या तक्रारी टोल फ्रि नंबर व व्हॉटसॲप नंबरवर दिल्यास अवैध/अनधिकृत होर्डिंग, जाहिरात फलक, बॅनर्स, पोस्टर्स, घोषणा फलकावर जप्त करुन कायदेशीर कारवाई करता येईल असे इस्टेट विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Comments