अन्नपूर्णा साखर कारखान्याला लागेल ते सहकार्य करणार आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांचे प्रतिपादन दुसऱ्या गळीत हंगामाला मोठ्या उत्साहात प्रारंभ या हंगामात कारखाना अडीच लाख टन गाळपाचे उद्दिष्ट यशस्वीपणे पार करेल

 अन्नपूर्णा साखर कारखान्याला लागेल ते सहकार्य करणार आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांचे प्रतिपादन दुसऱ्या गळीत हंगामाला मोठ्या उत्साहात प्रारंभ या हंगामात कारखाना अडीच लाख टन गाळपाचे उद्दिष्ट यशस्वीपणे पार करेल.

--------------------------------------------------------------------------------

-------------------------------------------------------------------------------
माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या अन्नपूर्णा साखर कारखान्याला लागेल ते सहकार्य करणार, असे प्रतिपादन आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी केले. कारखान्याच्या दुसऱ्या गळीत हंगामाच्या प्रारंभ कार्यक्रमात आमदार श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. माजी आमदार संजयबाबा घाटगे यांची जिद्द, चिकाटी आणि अपार परिश्रमाच्या जोरावर हा कारखाना दुसऱ्या गळीत हंगामात अडीच लाखाहून अधिक टणांचे गाळप यशस्वीपणे करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, अन्नपूर्णा साखर कारखाना हे शेतकऱ्यांच्या प्रखर इच्छाशक्ती व जिद्दीचे प्रतीक आहे. रक्त आटवून राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या श्रमाचे हे मंदिर आहे. हा कारखाना या हंगामातही प्रस्थापित कारखान्यांच्या जवळपासच दर देईल, असेही ते म्हणाले.

                

"तेरा साथ ना छोडेंगे

भाषणात आमदार श्री. मुश्रीफ यांनी संजयबाबा आपले कॉलेजपासूनचे मित्र असल्याचे आवर्जून सांगितले. वैचारिक मतभेदांवर संजयबाबा आणि मी ३० -३५  वर्षे एकमेकांच्या विरोधात लढत राहिलो. आत्ता आम्हा दोघांनीही काय मिळवायचं राहिलय? असा सवाल करीत ते म्हणाले, गोरगरीब जनतेच्या चांगल्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत. भाषणाच्या शेवटी शोले चित्रपटातील गाण्याची आठवण करून देत श्री. मुश्रीफ म्हणाले, ये दोसती हम नही तोडेंगे, तोडेंगे दम मगर.तेरा साथ ना छोडेंगे!"             

स्वागत व प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य अमरीशसिंह घाटगे यांनी केले. सूत्रसंचालन रमेश जाधव यांनी केले. आभार दत्तोपंत वालावलकर यांनी मानले.

Comments