पीएम सूर्यघर योजनेचा लाभ सर्व वीज ग्राहकांनी घ्यावा
.jpg)
पीएम सूर्यघर योजनेचा लाभ सर्व वीज ग्राहकांनी घ्यावा. --------------------------------- कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी शशिकांत कुंभार ---------------------------------- एमएसईबी सूत्रधारी कंपनीच्या संचालिका नीता केळकर यांचे आवाहन. *कोल्हापूर, दि. २८ जानेवारी २०२५-* प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना प्रत्येक घरगुती ग्राहकांसाठी असून या योजनेकरीता राष्ट्रीयकृत बँकांही अल्प व्याजदराने कर्जपुरवठा करत आहेत. राज्यातील सर्वच ग्राहकांनी याचा लाभ घेतला पाहिजे असे आवाहन एमएसईबी सूत्रधारी कंपनीच्या संचालिका नीता केळकर यांनी आज (दि. 2८) कोल्हापूर परिमंडल कार्यालयातील घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी कोल्हापूर परिमंडल कार्यालयाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, कोल्हापूर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0’, प्रधानमंत्री मोफत सूर्यघर योजना व इतर प्रमुख कामांचा आढावा घेण्यासाठी नीता केळकर यांनी कोल्हापूर येथे बैठक घेतली. तत्पूर्वी ग्राहक संघटना व उद्योजकांच्या समस्याही जाणून घेतल्या व त्यावर अंमल...