Header Ads

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्रचे अमरावती प्रतिनिधी पी. एन. देशमुख यांचा राज्यस्तरीय गौरव पुरस्काराने सन्मान.

 फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्रचे अमरावती प्रतिनिधी पी. एन. देशमुख यांचा राज्यस्तरीय गौरव पुरस्काराने सन्मान.

-----------------------------

अकोला प्रतिनिधी 

------------------------------

अमरावती येथील फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र या वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी तथा इंडिया टीव्ही न्यूज चैनलचे अमरावती प्रतिनिधी पी. एन. देशमुख यांना लोक स्वातंत्र पत्रकार महासंघ, अकोला यांच्यावतीने राज्यस्तरीय गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

अकोला येथे आयोजित विशेष समारंभात पी. एन. देशमुख यांना मानचिन्ह, शाल व श्रीफळ प्रदान करून गौरव करण्यात आला. सामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी निर्भीड व निष्पक्ष पत्रकारिता करत शासन दरबारी समस्या पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे. भ्रष्टाचाराला आळा बसावा व जनतेला न्याय मिळावा यासाठी त्यांनी सातत्याने लेखन व बातम्यांच्या माध्यमातून योगदान दिले आहे. त्यांच्या प्रभावी पत्रकारितेची राष्ट्रीय पातळीवर दखल घेत लोक स्वातंत्र पत्रकार महासंघाने त्यांना हा पुरस्कार प्रदान केला.

या गौरव सोहळ्याला लोक स्वातंत्र पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. संजय एम. देशमुख, कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाश अंधारे, विदर्भ शेतकरी अध्यक्ष डॉ. निलेश पाटील, साहित्यिक पुष्पराज गावंडेसर, डॉ. किरण वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर पत्रकार व संपादक उपस्थित होते.

कार्यक्रमावेळी ज्येष्ठ पत्रकार व समन्वयक पांडे सरांनी शंखनाद करून कार्यक्रमात उत्साह निर्माण केला. तसेच अकोला येथील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बाप्पू देशमुख यांनी प्रास्ताविक भाषणात पत्रकारांचे समाजातील महत्त्व अधोरेखित करत पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध संघटना खंबीरपणे उभी राहील, असे सांगितले. लोक स्वातंत्र पत्रकार महासंघ सहा राज्यांमध्ये कार्यरत असून मोठ्या संख्येने पत्रकार संघटनेत सहभागी झाल्याबद्दल त्यांनी गौरव व्यक्त केला.

No comments:

Powered by Blogger.