इच्छापूर्ती गणेश जयंती भक्तिभावात साजरी; भजन, बालखेळ व महाप्रसादाने परिसर भक्तिमय
इच्छापूर्ती गणेश जयंती भक्तिभावात साजरी; भजन, बालखेळ व महाप्रसादाने परिसर भक्तिमय.
----------------------
कोल्हापूर / प्रतिनिधी.
शशिकांत कुंभार :
-----------------------
संत गोरा कुंभार वसाहत परिसरात कुंभार समाजाचे आराध्य दैवत असलेल्या इच्छापूर्ती गणेशाची जयंती मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी सात वाजता इच्छापूर्ती गणेशाचा अभिषेक करण्यात आला. यावेळी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी नऊ वाजता विधिवत होम-हवन करण्यात आले. त्यानंतर महाआरती झाली. दुपारी बारा वाजून चार मिनिटांनी गणेश जन्मकाळ साजरा करण्यात आला. यावेळी “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषाने परिसर दणाणून गेला.
सायंकाळी सहा वाजता भक्तांसाठी भजनाचे आयोजन करण्यात आले होते. या भजनाचा उपस्थित नागरिकांनी भक्तिभावाने आनंद घेतला. तसेच बालचमूसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते, यामुळे कार्यक्रमाला उत्साही वातावरण निर्माण झाले.
सायंकाळी सात वाजता इच्छापूर्ती गणेशाची महाआरती करण्यात आली. आरतीनंतर स्वप्नील तहसीलदार, सागर तहसीलदार तसेच नूतन नगरसेवक प्रभाग क्रमांक २ शिवसेनेच्या प्राजक्ता जाधव यांनी इच्छापूर्ती गणेशाचे दर्शन घेतले. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
कुंभार समाजाच्या सदस्यांनी नेटक्या नियोजनातून महाप्रसादाचे वाटप केले. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण कार्यक्रम शांततेत, भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला.

No comments: