विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन.
विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन.
-----------------------------------------
राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे
------------------------------------------
राधानगरी गाव हे तालुक्याचे ठिकाण असून देखील येथे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. वीज खंडित होण्याच्या प्रकारामुळे येथील शासकीय व खाजगी काम विस्कळीत होते. हा वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसे राधानगरी तालुका यांच्या वतीने देण्यात आला. याबाबतचे निवेदन विद्युत वितरण कंपनी राधानगरी यांना देण्यात आला. राधानगरी येथे तहसील कार्यालय, पंचायत समिती, भूमी अभिलेख कार्यालय, बँका, इतर शासकीय कार्यालय असल्याने तालुक्यातून कामानिमित्त रोज नागरिक येत असतात. पण, राधानगरी येथे वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांची अनेक कामे खोळंबत आहेत. त्यामुळे विद्युत पुरवठा लवकर सुरळीत व्हावा, असे निवेदन मनसे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांच्या वतीने उपभियंता ओंकार डांगे व संदीप माने यांना देण्यात आले. यावेळी मनसे तालुका उपाध्यक्ष जगदीश पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment