कुडाळ गटाला ३६५ दिवस जनतेसोबत उभं राहणारं नेतृत्व: जयश्री शेवते
कुडाळ गटाला ३६५ दिवस जनतेसोबत उभं राहणारं नेतृत्व: जयश्री शेवते
-------------------------
प्रतिनिधी/ शेखर जाधव .
--------------------------
भणंग :--कुडाळ गटाला आता केवळ निवडणूक पुरते दर्शन देणारे नव्हे,तर वर्षभर ३६५ दिवस जनतेच्या सुख- दुःखात सहभागी राहणारे सक्षम,संवेदनशील आणि जबाबदार नेतृत्व हवे आहे,असे प्रतिपादन कुडाळ गटाच्या अपक्ष उमेदवार जयश्री शेवते यांनी केले.कुडाळ जिल्हा परिषद गटातील प्रचार दौऱ्या दरम्यान बोलताना जयश्री शेवते म्हणाल्या, गेल्या अनेक दशकांपासून नागरिकांचे प्रश्न केवळ निवडणुकीच्या काळात ऐकले जातात आणि त्यानंतर दुर्लक्षित राहतात,अशी भावना सर्वसामान्य जनतेत आहे.निवडून येणे ही शेवटची पायरी नसून,जनतेसाठी लढण्याची खरी सुरुवात असते.विकासकामांसोबत संकटात,आनंदात,सण-उत्सवात आणि अडचणीच्या काळात 'हाक मारा, मी हजर असेन' हीच माझी भूमिका असेल असे मत जयश्री शेवते यांनी प्रचार दरम्यान व्यक्त केले आहे.
यावेळी दीपक शेवते बोलताना म्हणाले "गटाचा सर्वांगीण विकास हेच आपले मुख्य उद्दिष्ट आहे.स्थानिक पातळीवर 'निवडणूकपूर्व आश्वासने आणि निवडणुकीनंतर शांतता' या जुन्या मॉडेलऐवजी 'निवडणूकपूर्व आणि निवडणूकनंतरही सतत सेवा' या नव्या मॉडेलची गरज असल्याचा
संदेश आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचवत आहोत. जनतेच्या कायम संपर्कात राहणाऱ्या प्रतिनिधीक व्यवस्थेचा आराखडा मांडला आणि चोवीस तास संपर्क यंत्रणा, नागरिक प्रतिनिधी सहाय्य केंद्र, तक्रार नोंदणी व फॉलोअप व्यवस्था, गावनिहाय समस्या नकाशे, शासन योजनांची माहिती थेट दारात या बाबी अंमलात आणण्याचा निर्धार जयश्री शेवते यांनी व्यक्त केला आहे.
चौकट:
निवडून आल्यानंतर विकासाचा महापूर कुडाळ परिसरात आणणार असल्याचा विश्वास जयश्री शेवते यांनी व्यक्त केला आहे.तालुक्यातील पाणीटंचाई,शेतकरी उत्पादनाला योग्य दर हे प्रश्न केवळ निवडणूकपुरत्या भेटीने सुटणार नाहीत,तर त्यासाठी दीर्घकालीन व शाश्वत उपायांची गरज असल्याचे जयश्री शेवते यांनी स्पष्ट केले.

No comments: