मिरजमध्ये गांजा विक्री करणाऱ्या सराईतावर छापा २ किलो गांजा व दुचाकीसह सुमारे १ लाखांचा मुद्देमाल जप्त
मिरजमध्ये गांजा विक्री करणाऱ्या सराईतावर छापा
२ किलो गांजा व दुचाकीसह सुमारे १ लाखांचा मुद्देमाल जप्त.
-------------------------मिरज | प्रतिनिधी
राजु कदम .
-----------------------
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच नशामुक्त भारत अभियान अंतर्गत सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी कारवाई तीव्र करण्यात आली असून, मिरज शहरात गांजा विक्री करणाऱ्या एका सराईत संशयितावर महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत २ किलो वजनाचा तयार गांजा, दुचाकीसह सुमारे १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. २९ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मिरज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या पाठीमागील बोव्यात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी गु.र.नं. २१/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा कलम ८(क), २०(ब), २२(ख) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत नवाज सलीम मकानदार (वय ३२, रा. प्रताप कॉलनी, रॉकेल डेपो झोपडपट्टी, मिरज) या सराईत संशयितास अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून अंदाजे ५० हजार रुपये किमतीचा २ किलो गांजाचा साठा तसेच दुचाकी जप्त करण्यात आली आहे. संशयित मिरज परिसरात चढ्या दराने किरकोळ स्वरूपात गांजा विक्री व वितरण करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
मा. संदीप घुगे (पोलीस अधीक्षक, सांगली), मा. कल्पना बारवकर (अपर पोलीस अधीक्षक, सांगली) व मा. प्रणिल गिल्डा (उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली, संदीप शिंदे (सहाय्यक पोलीस निरीक्षक, प्रभारी – महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे) यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, हेड कॉन्स्टेबल अभिजीत धनगर, सचिन कुंभार, पोलीस नाईक नानासाहेब चंदनशिवे, कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ, विनोद चव्हाण, मोसीन टिनमेकर, राजेंद्र हारगे, अमोल तोडकर, चालक हेड कॉन्स्टेबल निवास माने व पोलीस नाईक देवानंद नागरगोजे यांनी सहभाग घेतला.
संशयितास न्यायालयात हजर केले असता दि. २ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव करीत आहेत.
महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडून नशायुक्त पदार्थ, गांजा व गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधात सातत्यपूर्ण व कठोर कारवाई सुरू असून, नागरिकांनी अंमली पदार्थांबाबत माहिती पोलीस प्रशासनास देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments: