करवीर पोलिसांची मोठी कारवाई वैद्यकीय गर्भपात प्रकरणातील मुख्य फरार आरोपी अटकेत आरोपीस ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी.
करवीर पोलिसांची मोठी कारवाई
वैद्यकीय गर्भपात प्रकरणातील मुख्य फरार आरोपी अटकेत
आरोपीस ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी.
---------------------------कोल्हापूर | प्रतिनिधी.
शशिकांत कुंभार..-
--------------------
करवीर पोलीस ठाण्यात दाखल गु. र. नं. ७२७/२०२५ अन्वये BNS कलम ९१, ३१९(२), १२५, २७८ तसेच वैद्यकीय गर्भपात कायदा कलम ३ व ४ अंतर्गत दाखल गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपीस करवीर पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेला आरोपी स्वप्निल केरबा पाटील (वय ३६, रा. जय भवानी मंगल कार्यालय शेजारी, पाडळी खुर्द, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यास पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले.
सदर आरोपी हा गुन्ह्यात मुख्य भूमिका बजावणारा असल्याने करवीर पोलीस त्याचा कसोशीने शोध घेत होते. दरम्यान, आरोपी हा बागल चौक येथील शाहूमिल रोडवर क्राऊन फर्निचरसमोरील इमारतीत दुसऱ्या मजल्यावर वास्तव्यास असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी वॉच ठेवून आरोपीस त्याच्या राहत्या घरी काल रात्री उशिरा अटक केली.
अटक केलेल्या आरोपीस दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी मा. न्यायालयात हजर करण्यात आले असता, दि. ०५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.
ही कारवाई किशोर शिंदे, पोलीस निरीक्षक, करवीर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत गुन्हे शोध पथकातील सहाय्यक फौजदार राहुल देसाई, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुभाष सरवडेकर, पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील, अमित जाधव तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रज्ञा पाटील यांनी सक्रिय सहभाग घेऊन आरोपीस अटक केली.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास करवीर पोलीस ठाण्याकडून सुरू असून, आरोपीकडून अधिक माहिती उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

No comments: