खाजगी सावकारांच्या सावटाखाली कुंभोज व परिसरातील नागरिक; कर्जाला कंटाळून काही ठिकाणी टोकाची भूमिका.
खाजगी सावकारांच्या सावटाखाली कुंभोज व परिसरातील नागरिक; कर्जाला कंटाळून काही ठिकाणी टोकाची भूमिका.
---------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
---------------------------
कुंभोज व परिसरातील अनेक गावांमध्ये खाजगी सावकारांनी आपली मुळे खोलवर रोवली असून, शेतकरी, लघु उद्योजक व सामान्य नागरिक यांच्यावर आर्थिकदृष्ट्या अन्यायकारक अटी लादल्या जात आहेत. उच्च व्याजदर, धमकीची भाषा, जप्तीची भीती यामुळे अनेक कुटुंबे भयभीत झाली असून प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, काही सावकार अधिकृत परवाना नसतानाही बेकायदेशीररित्या कर्ज व्यवहार करत असून, वेळेत हप्ते न भरल्यास मालमत्ता बळकावण्याचे प्रकार समोर येत आहेत. काही प्रकरणांमध्ये सामाजिक प्रतिष्ठा डागळवण्याचीही भीती सावकारांकडून दाखवली जाते. सध्या परिसरात 10% पासून 15 टक्के पर्यत व्याजदर आकारला जात असून भीक नको पण कुत्रा वर अशी परिस्थिती सध्या काही नागरिकांची निर्माण झाली आहे पण ना मी मूळ रकमेपेक्षा व्याज जास्त जात असल्याने विनापरवाना खाजगी सावकारी करणारे सावकार व त्यांचे बगलबच्चे सध्या मोठ्या दिमाखात फिरत असल्याचे चित्र दिसत आहे परिणामी याबाबतीत पोलीस यंत्रणा गप्प का असा संवाल ही निर्माण होत असून या खाजगी सावकारांच्या वर शासकीय यंत्रणेचा तसेच राजकीय पुढार्यांचा वरदास्त असल्याची चित्र दिसत आहे परिणामी त्याचाच गैरफायदा घेऊन ही सावकार की ग्रामीण भागात फोफवत असल्याचे चित्र दिसत आहे.
शेतकरी ग्रामस्थ व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून तहसील कार्यालयासमोर निवेदन देत या सावकारांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावर बोलताना स्थानिक प्रशासनाने चौकशी करून दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले आहे.
अशा प्रकारचे कोणतेही आर्थिक शोषण खपवून घेतले जाणार नाही. नागरिकांनी पोलिसांत तक्रार करावी, आम्ही त्यावर तत्काळ कारवाई करू," असे वक्तव्य तहसीलदारांनी दिले आहे.विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांनी खाजगी सावकारांकडून कर्ज घेण्याऐवजी शासकीय योजना, बँका व अधिकृत पतसंस्थांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
परिणामी बँका व पतसंस्था यांच्यामध्ये कर्ज काढत असताना सर्वसामान्य नागरिकाला कागदपत्रासाठी मारायला लागणारे हेलपाटे व संस्थाचालकांचे कर्जासाठी करावी लागणारी मनधनी यामुळे सर्वसामान्य नागरिक तात्काळ मिळणाऱ्या खाजगी सावकारकीच्या पैशाकडे वळत असून परिसरातील पतसंस्था व बँक चालकांनी सर्वसामान्य नागरिक कर्ज काढण्यासाठी आल्यावर त्याच्यात कागदपत्राचे लादणात आलेला बोजा कुठेतरी कमी करावा व त्याला तात्काळ मदत करावी अशी चर्चा नागरिकांच्यातून होत आहे.विनोद शिंगे कुंभोज
Comments
Post a Comment