कणेरी येथील शाळेची संरक्षक भिंत कोसळली; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.
कणेरी येथील शाळेची संरक्षक भिंत कोसळली; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.
----------------------------------------
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
------------------------------------
गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : करवीर तालुक्यातील कणेरी येथील श्री. काडसिद्धेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची सुमारे १८ वर्षांपूर्वी बांधलेली संरक्षक भिंत मुसळधार पावसामुळे नाल्यात कोसळली आहे. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेच्या समोरील बाजूने वाहणारा ओढा अनेक दिवसांपासून स्वच्छ करण्यात आलेला नाही, ज्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तुटलेली संरक्षक भिंत आणि नाल्यातील ही दुर्गंधी यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे.
या गंभीर समस्येकडे पालकांनी शासनाचे आणि स्थानिक प्रशासनाचे तातडीने लक्ष वेधले आहे. कोसळलेली संरक्षक भिंत लवकरात लवकर दुरुस्त करावी आणि नाल्याची स्वच्छता युद्धपातळीवर करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करता येईल.
Comments
Post a Comment