कोल्हापूर शाहूपुरी परिसरात १.३७ लाखांचा गांजा जप्त; एकाला अटक.

 कोल्हापूर  शाहूपुरी परिसरात १.३७ लाखांचा गांजा जप्त; एकाला अटक.


---------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी

संस्कार तारळेकर

---------------------------------

शाहुपुरी  : पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार, अवैध धंदे आणि अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाईचा धडाका सुरू आहे. याच मोहिमेअंतर्गत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ३ किलो १०० ग्रॅम वजनाचा गांजा आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख ३७ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका इसमाला अटक करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार शुभम संकपाळ आणि विशाल चौगले यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतील शुगरमिल कॉर्नर ते शिये फाटा रोडवरील श्री मंगल कार्यालयाच्या पुढे एक व्यक्ती मोटरसायकलवरून येऊन गांजा विक्री करत आहे.

या माहितीच्या आधारे, LCB चे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे आणि त्यांच्या पथकाने १८ जुलै २०२५ रोजी सापळा रचून छापा टाकला. यावेळी, सचिन शामराव पाटील (रा. १८३२ ई वॉर्ड, शाहूनगर, राजारामपुरी, कोल्हापूर) याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्या ताब्यात बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेला गांजा आणि इतर संबंधित वस्तू आढळून आल्या.

जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये ३ किलो १०० ग्रॅम गांजा आणि इतर साहित्य मिळून एकूण १,३७,७०० रुपये किमतीचा ऐवज आहे. आरोपी सचिन पाटील याच्याविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास शाहूपुरी पोलीस ठाणे करत आहे.

पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, LCB चे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, तसेच पोलीस अंमलदार अशोक पोवार, सचिन पाटील, शुभम संकपाळ, विशाल चौगले, लखनसिंह पाटील, विलास किरोळकर, अरविंद पाटील, विजय इंगळे, संदीप बेंद्रे, सागर माने, संजय कुंभार, महेश पाटील, महेश खोत आणि अमित सर्जे यांनी ही यशस्वी कामगिरी केली.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.

हिम्मत असेल तर राजेश पवाराणी भिलारेना बोट लावून दाखवावे _ माधव पाटील पवळे.