आमचा मुंबई बॉम्ब स्पोटशी काही संबंध नव्हता. तुरुंगा बाहेर येताच सोहेल मोहम्मद शेखचा दावा " सरकार व न्यायालयाचे मानले आभार.

 आमचा मुंबई बॉम्ब स्फोटांशी काही संबंध नव्हता. तुरुंगा बाहेर येताच सोहेल मोहम्मद शेखचा दावा  " सरकार व न्यायालयाचे मानले आभार.           

--------------------------------------------- 

  फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र       

अमरावती जिल्हा प्रतिनिधी.    

 पी एन देशमुख.                        

----------------------------------------------         

              अमरावती.                                        मुंबई उच्च न्यायालयाने २00६च्या रेल्वे बॉम्ब स्फोटातील १२ आरोपीची निर्दोष मुक्तता  केली आहे. कोर्टाच्या या आदेशानंतर लगेचच या आरोपीच्या सुटकेची प्रक्रिया सुरू झाली आहे. अमरावती तुरुंगातून सुटका झालेल्या एका आरोपीने सुटकेनंतर सरकार व न्यायालयाचे आभार मानत आपला या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केला आहे. ११ जुलाई २00६ रोजी मुंबईच्या लोकल रेल्वे अवघ्या११ मिनिटात ७ स्फोट झाले होते या घटनेमुळे अवघी मुंबापुरी हादरली होती. या भीषण दहशतवादी हल्ल्यात  १८९  नागरिकांच्या मृत्यू झाला. तर  ८00 हुन अधिक जण जखमी झाले होते. मुंबई हायकोर्टाने सोमवारी याप्रकरणी झालेल्या सुनावणी सर्वच १२ आरोपीची  सुटका केली. त्यानुसार अमरावती पुणे नागपूर या तीन जिल्ह्यात मागील  २0 वर्षापासून शिक्षा भोगणाऱ्या ११ आरोपीच्या सुटकेची प्रक्रिया सुरू झाली अमरावती मध्यवर्ती कारागृह ४ आरोपी होते या सर्वांना सोमवारी रात्री उशिरा सुटका करण्यात आली. त्यानंतर ते लगेच मुंबईच्या दिशेने रवाना झाले. तत्पूर्वी सोहेल मोहम्मद शेख यांने पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्याने आपल्यावरील सर्वच आरोप फेटाळून लावले. आज तब्बल  २0 वर्षानंतर आमची तुरुंगातून सुटका झाली. आमचा न्यायलावर विश्वास आहे . आमचा या प्रकरणाची कोणताही संबंध नव्हता पण आता जाऊ द्या आमची सेशन कोर्टातच सुटका होण्याची गरज होती पण तसे झाले नाही आम्हाला हायकोर्टाने सोडले आणि या प्रकरणी सरकार व कोर्ट व आमच्या वकिलांचे आभार मानतो. आम्ही ४ जन अमरावतीच्या तुरुंगात होतो २00६ या प्रकरणात आम्हाला  अटक करण्यात आली आता आमची सरकारकडे कोणतीही मागणी नाही धन्यवाद असेल तो याप्रकरणी बोलताना म्हणाला माझ्यावर चीनची संबंध असल्याचा आरोप होता पण तसे काहीही नव्हते खूप जुनी गोष्ट आहे बस आम्ही फसलो अस तो बोलताना म्हणाला.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.