अमरावती शहरात देव दर्शनासाठी जात असलेल्या महिलेला पेट्रोल टॅंकरने चिरडले ईरवीन ते राजापेठ उड्डाणपूलावरील धक्कादायक घटना.

 अमरावती शहरात देव दर्शनासाठी जात असलेल्या महिलेला पेट्रोल टॅंकरने चिरडले ईरवीन ते राजापेठ उड्डाणपूलावरील धक्कादायक घटना. 

------------------------------------ 

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

 अमरावती जिल्हा प्रतिनिधी. 

पुंडलिक राव देशमुख 

-------------------------------------- 

अमरावती.                                    अमरावती शहरातील इरवीण चौक कडून राजापेठ दिशेने    दुचाकी वरुन  जात असलेल्या महिलेला पाठीमागून आलेल्या पेट्रोल  टँकरने चिरडले. यात त्या महिलेचा घटनास्थळी मृत्यू झाला हा अपघात गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता झाला दुचाकी वरील महिला अर्जुन नगर मधून साईनगर मधील साई मंदिरात दर्शनाला जात होत्या. वर्षा सोपानराव काळंगे वय ५४ ग्रीन पार्क रेसिडेन्सी पूर्वा टाउनशिप अर्जुन नगर अमरावती असे त्या मृत महिलेचे नाव आहे. वर्षा काळंगे दर गुरुवारी साई मंदिरात दर्शनासाठी जात होत्या आज सकाळी त्या दुचाकीने साईनगर ला जाण्यासाठी निघाल्या होत्या दरम्यान ईरवीन चौकातून राजापेठ कडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर असतानाच मागून एक पेट्रोल टँकर वर्षा काळंगे यांच्या टू व्हीलर ला ओव्हरटेक करत असताना त्यांच्या दुचाकी ला धक्का लागला व त्या दुचाकीसह खाली कोसळल्या याचवेळी टँकरचे मागील चाक त्यांच्या मानेवरून गेले त्यामुळे त्या घटनास्थळीत रक्त बांबळ झाल्या होत्या. याचवेळी रस्त्याने येजा करणाऱ्या वाहनचालकांनी त्यांना रुग्णवाहिकेत टाकून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले अपघाताची माहिती मिळतात सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोहर कोटनाके पीएसआय यादव पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी टँकर चालक रघुनाथ रामकृष्ण चौधरी वय ५५ आशीर्वाद नगर अमरावती याला ताब्यात घेतले असून टॅंकर जप्त केला अशी माहिती  पोलिसांनी दिली आहे. दरम्यान वर्षा काळंगे यांच्या मृतदेहाची आज शुक्रवारी  ४ जुलै रोजी उत्तरीय तपासणी होणार असून त्यानंतर पार्थिव वार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे या पुलावरून अनेक वाहतूक करणारे राग साईडने येताना दिसून येतात उड्डाण पुलावरील वाहनाच्या वेगावर नियंत्रण दिसून येत नाही.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.

हिम्मत असेल तर राजेश पवाराणी भिलारेना बोट लावून दाखवावे _ माधव पाटील पवळे.