तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.
तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.
------------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
------------------------------------
राधानगरी तालुक्यातील तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती हिचे प्रेत तुरंबे गावातील एका विहिरीत सापडले असल्याची माहिती राधानगरी पोलिसांनी दिली
या बाबत अधिक माहिती अशी की तुरंबे येथील मारुती विष्णू वारके आबाजी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये कुमारी नम्रता मोहन कांबळे वर्षे १३ ही दिनांक 2 जुलै रोजी दुपारी 12 45 ते एक या वेळेत मधल्या सुट्टी मध्ये बाथरूमला जातो असे सांगून गेली होती ती अद्याप आली नसल्याने तिचा शोध घेऊन मिळून आले नाही म्हणून तिचे वडील मोहन कांबळे यांनी राधानगरी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली परंतु कुमारी नम्रता हिचा मृतदेह तुरंबे गावातील रमेश मारुती वारके यांच्या शेतातील विहिरीमध्ये मिळून आला असून आत्महत्या की घातपात अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये होत असल्याचे समजते
याबाबत अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल सूर्यवंशी व भोसले हेकरीत आहेत
Comments
Post a Comment