Header Ads

महापालिकेची जनावरांवरील कारवाई सुरू दोन जनावरे जप्त करून पांजरपोळ संस्थेकडे सुपूर्द.

 महापालिकेची जनावरांवरील कारवाई सुरू दोन जनावरे जप्त करून पांजरपोळ संस्थेकडे सुपूर्द.


संस्कार कुंभार.
--------------------

कोल्हापूर, दि. 16 : कोल्हापूर शहरातील सार्वजनिक ठिकाणी भटकणाऱ्या पाळीव आणि भटक्या जनावरांवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. आज महापालिकेच्या पथकाने या मोहिमेअंतर्गत शहरातील दोन जनावरे जप्त केली. ही जनावरे काटेभोगाव येथील पांजरपोळ संस्थेकडे पाठविण्यात आली आहे.


            प्राण्यांवर होणाऱ्या अन्यायकारक वागणुकीला आळा बसावा यासाठी प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 335 मधील तरतुदींचा आधार घेण्यात आला आहे. नागरीकांनी आपल्या पाळीव जनावरांना मोकाट सोडू नये, अशा मोकाट जनावरे सोडणा-यावर महापालिकेच्यावतीने जनावरे जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

No comments:

Powered by Blogger.