मुरगूड नगरपालिकेच्या कर्मचारी वर्गाचा सत्कार.
मुरगूड नगरपालिकेच्या कर्मचारी वर्गाचा सत्कार.
----------------------------
मुरगुड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
----------------------------
मुरगूड नगरपालिकेचा स्वच्छ सुंदर शहर अभियाना अंतर्गत केंद्रात 26 वा व राज्यात 4 था क्रमांक आल्याबद्दल नगरपालिका कर्मचारी व अधिकारी यांचा भेटवस्तू देऊन नागरी सत्कार लाल आखाडा व मुरगुडचे माजी उपनगराध्यक्ष संतोषकुमार वंडकर यांच्यावतीने करण्यात आला
या सत्कार समारंभाचे प्रमुख पाहुणे मुरगूड नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अतिश वाळूंज म्हणाले तुम्ही केलेला सत्कार म्हणजे आम्हाला मिळालेले प्रोत्साहन आहे. सत्कारामुळे आमचे कर्मचारी व आम्ही आज राज्यात 4 क्रमांक आला असला तरी तुमच्या या सत्काराच्या जोरावर व पाठबळामुळे पहिला क्रमांक मिळवण्यासाठी अग्रेसर राहू असे सांगितले
यावेळी वाढदिवसाचं निमित्त साधून संतोष वंडकर यांचा सत्कार मुरगूड चे माजी उपनगराध्यक्ष बजरंग सोनुले व डॉ.अशोक खंडागळे यांच्या हस्ते करण्यात आला
यावेळी दगडू शेणवी बबन बारदेस्कर, संतोष वंडकर यांनी आपली मनोगत व्यक्त केली कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक नामदेव भांदिगरे ,राजू आमते दत्तामा जाधव, मोहन कांबळे, बाजीराव चांदेकर अमर देवळे अनिल बोटे,शंकर इंगवले,के डी.मेंडके विपुल अपराध ,भिकाजी कांबळे सचिन मगदूम ,प्रमोद वंडकर मयूर सावर्डेकर ,बाजीराव जाधव, जीवन भोसले ,योगेश वंडकर शुभंम वंडकर आदी उपस्थित होते
स्वागत राजू चव्हाण यांनी केले तर
प्रस्ताविक प्रा.पृथ्वीराज कदम यांनी केले.सूत्रसंचालन अमोल एकल यांनी तर
आभार बाळासाहेब मंडलिक यांनी केले
Comments
Post a Comment