Header Ads

कळे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.

 कळे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.

---------------------------------

कळे प्रतिनिधी

साईश मोळे

9595316266

---------------------------------

श्रावण महिना हा हिंदू कॅलेंडरमधील एक पवित्र महिना आहे, जो भगवान शंकराला समर्पित आहे. या महिन्यात, भक्त उपवास करतात, पूजा-अर्चा करतात आणि भगवान शंकराचा आशिर्वाद मिळविण्यासाठी ध्यान करतात. श्रावण महिना नैऋत्य मान्सूनच्या आगमनाशी संबंधित आहे आणि त्यामुळे या महिन्यात भरपूर पाऊस पडतो, ज्यामुळे निसर्गाची हिरवळ अधिक सुंदर दिसते.*

 

या पवित्र महिन्याचे औचित्य साधून कळे येथील सत्यसाई भक्त श्री.हरीदास पोवार यांच्या घरी दरवर्षी ग्रंथ पारायण सोहळा आयोजित केला जातो. यावर्षीच्या *पवित्र श्रावण मासाचा शुभारंभ त्यांनी गुरुचरित्र ग्रंथ पारायणाने सुरू केला आहे.* या महिन्यातील ग्रंथ पारायण बरोबरच विविध धार्मिक कार्य घरी आयोजित करतात. शुक्रवारी पहिला श्रावणी दिवस निमित्ताने त्यांनी आपले घरी साई भजन आयोजित केले होते.

यावेळी श्री.सत्यसाई सेवा संघटना कळे चा  सत्संग ही पार पडला.


यावेळी जिल्हा सेवादल  प्रमुख दत्तात्रय पाटील, जिल्हा युथप्रमुख बच्चन लव्हटे, कळे समितीचे अध्यात्मिक प्रमुख पंकज इंजुळकर, कळे समिती प्रमुख व हाँटेल साई प्रार्थना चे मालक अनिल मोळे, वाघुर्डे समिती प्रमुख तानाजी पाटील, ज्ञानदेव आवाड व सावर्डे समिती प्रमुख रोहित भोसले 

उपस्थित होते. 


यावेळी मार्गदर्शन करताना दत्तात्रय पाटील यांनी *सेवेचे महत्व व सेवा का करावी या संदर्भात मार्गदर्शन केले. व सर्व साई भक्तांसाठी प्रशांती निलियम हे आपलं माहेरघर आहे व तिथे आपली लेकी प्रमाणेच काळजी घेतली जाते.* त्याची प्रचिती प्रत्येकाला आपल्या सेवाकाळात येतेच असे मार्गदर्शन केले. 


त्यानंतर युथ प्रमुख बच्चन लव्हटे यांनी मार्गदर्शन केले .त्यांनी बोलताना यावेळी *स्वामींनी दिलेल्या शिकवणीचा व मूल्यांचा वापर आपल्या जीवनात अत्यंत सुलभ रीतीने करायला हवा व आपलं जीवन साईकार्यात व्यतित करायला हवं.*

 आपण निवडलेलं ईश्वराचं रूप हेच आपल्यासाठी सर्वस्व आहे, असं म्हणून त्या रूपाची आपण मनोभावे प्रार्थना करावी, तरच आपल्याला ईश्वराची अनुभूती लाभू शकते अथवा आपण प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी आपली भक्ती प्रकट करून आपण आपल्याच ईश्वरावर आपला अविश्वास दाखवू नये.    

आपण आपल्या जीवनात  *पापभीती, दैवप्रती व संघनिती* या मूल्यांचा वापर करून आपण प्रत्येकाशी प्रेमाने व आपुलकीने राहुन आपले मतभेद बाजूला सारावे व आपलं कार्य साईचरणी अर्पण करावे. तसेच त्यांनी पुट्टपर्ती येथील साई कुलवंत हॉल व सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल यांचे महत्त्व व स्वामींची योजना याबद्दलही मार्गदर्शन केले. 


शेवटी  पंकज इंजुळकर यांनी मार्गदर्शन करताना *परमेश्वराने आपल्याला या पृथ्वीतलावर एक पात्र साकारण्यात दिलं आहे ते प्रत्येकाने प्रामाणिकपणे साकारून दिवसाच्या शेवटी आपण आपलं कार्य परमेश्वरचरणी अर्पण करून* आपला दिवस व्यतित केला पाहिजे असे मार्गदर्शन केले. 


याप्रसंगी कळे समितीमधून दिलीप खांबे, मधुकर खांबे, अनिल घुंगुरकर,धनराज मोळे तसेच इतर साई भक्त व महिला साई भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शेवटी मंगल आरती करून भजनाची सांगता करण्यात आली.

No comments:

Powered by Blogger.