विठुरायाच्या आषाढी पालखीचे मुरगूड मध्ये जागोजागी भावभक्तीने स्वागत.
विठुरायाच्या आषाढी पालखीचे मुरगूड मध्ये जागोजागी भावभक्तीने स्वागत.
----------------------------------------
मुरगूड/ जोतीराम कुंभार
----------------------------------------
मुरगूडमधे विठ्ठल रूक्मिणीच्या पालखीचे भक्तिमय वातावरणात स्वागत .
" विठु माऊली तू माऊली जगाची
राजा तू पंढरीचा..राजा तू पंढरीचा
अवघे गर्जे पंढरपूर, चालला विठू नामाचा गजर."
अशा भक्तिगीतांच्या तालावर विठ्ठल भक्तांनी शहरातील प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी पालखीचे स्वागत केले.आरती केली.
गाव भागातील अंबाबाई मंदिर,राम मंदिर,जुन्या पोलिस ठाण्या तील दत्त मंदिर,हनुमान मंदिर, राणाप्रताप चौक मकानदार नगरपरिषदे जवळील दरेकर आत्मरूप बरकाळे गणेश मंदिर ,अशा सर्व ठिकाणी पालखीची आरती झाली.वारकरी पंथाच्या भक्तांनी टाळ मृदुंगाच्या तालावर रिंगण केले.फुगडी घातली.भजने म्हंटली. ठिकठिकाणी खिचडी केळे दूध राजगिरी लाडू बटाटे वेफर्स वाटप भक्त करत होते
परम विठ्ठल भक्त व आंतर राष्ट्रीय कीर्तीचे प्रवचनकार डॉ.देखमुख साहेब यांच्या निवासस्थळी पालखी पोहचली आणि भक्तीचा पूर ओसंडून वाहू लागला.
यावेळी उपस्थिती श्री विश्वास रावण धोंडीराम राऊत शामराव मेंडके धोंडीराम खैरे धोंडीराम मकानदार सुहास खराडे भाऊ येरुडकर मारुती शेट्टी संतोष लोहार साताप्पा मेंडके महादेव वंडकर चंद्रकांत तिकोडे श्रीरंग गुरव सचिन गुरव निंगाप्पा सिद्धाप्पा नवर किल्ले प्रकाश मगदूम कृष्णा कुंभार शिवाजी गोंधळी विठ्ठल भुते सर्जेराव भाट यावेळी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment