प.पु. श्री. गगनगिरी महाराज गुरुपौर्णिमा महोत्सवाचे श्री क्षेत्र गगनगड येथे भव्य आयोजन!

 प.पु. श्री. गगनगिरी महाराज गुरुपौर्णिमा महोत्सवाचे श्री क्षेत्र गगनगड येथे भव्य आयोजन!

--------------------------------------

कळे ता.पन्हाळा प्रतिनिधी

 साईश मोळे

----------------------------------------

         सालाबादप्रमाणे याही वर्षी विश्वविख्यात योगीराज श्री गगनगिरी महाराज यांचा गुरुपौर्णिमा महोत्सव, त्यांच्या लाखो भाविकांतर्फे, महाराजांच्या आवडत्या व अभिजात निसर्गसौंदर्याने नटलेल्या जगप्रसिद्ध गगनगड आश्रमात साजरा करण्यांत येणार आहे. 

          सदर धार्मिक उत्सवास बुधवार दि. ९ जुलै पासून प्रारंभ होणार असून त्याची सांगता शुक्रवार दि.११ जुलै रोजी होणार असून या निमित्ताने आश्रमस्थानी भजन-कीर्तन-प्रवचन , नामस्मरण,होमहवन-भंडारा आदी धार्मिक विधींचे भव्य प्रमाणावर आयोजन करण्यांत आले आहे. 

         श्री गुरुपौर्णिमेच्या परम पावन दिनी गुरूवार दि. १० जुलै रोजी पहाटे ४.०० वा . पासून श्रींचे मूर्तीवर वेदमंत्राच्या पवित्र घोषात मंगल स्नान घालण्यांत येणार असून पादुकांवर पूजा - अभिषेक झाल्यानंतर संपूर्ण समाधीस्थानी विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात येईल व तदनंतर मुख्य दर्शनास प्रारंभ होईल. साधारण सकाळी ६ वा. दर्शनास प्रारंभ झाल्यावर संपूर्ण दिवसभर दर्शन-कार्यक्रम सुरु राहणार असून रात्रौ ८.३० वाजता महाआरतीचा कार्यक्रम संपन्न होईल. भाविक भक्तांच्या सोईसाठी सकाळी १० वाजेपासून भक्तांना महाप्रसाद देण्यात येईल. 

       सदरहू उत्सवाची सांगता शुक्रवार दि.११ जुलै रोजी होम - हवनाचे कार्यक्रमाने होणार आहे. तरी जास्तीत जास्त भाविक भक्तांनी गगनगड आश्रमस्थानी येवून योगीराज श्री गगनगिरीमहाराजांचे पादुकांचे दर्शन-आशिर्वादाचा लाभ घ्यावा व आश्रमसंस्थेच्या वतीने आयोजित धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घेवून सहकार्य करावे असे आवाहन संजयदादा पाटणकर सरकार यांनी करण्यांत आले आहे.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.