घोटवडे येथील दोन दूध संस्थांमध्ये चोरीचा प्रयत्न.
घोटवडे येथील दोन दूध संस्थांमध्ये चोरीचा प्रयत्न.
***********************
राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे
************************
राधानगरी आणि करवीर तालुक्यांच्या सीमेवरील घोटवडे (ता. राधानगरी) येथे चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. हनुमान दूध संस्था आणि स्वयंभू विकास सहकारी संस्था या दोन सहकारी संस्थांच्या इमारतींना लक्ष्य करत चोरट्यांनी शटरची कुलूपे तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
या प्रयत्नात चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नसले तरी, जाताना त्यांनी काही मुद्देमाल लंपास केला. हनुमान दूध संस्थेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे साहित्य आणि स्वयंभू दूध संस्थेतील रोख दहा हजार रुपये असा एकूण वीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला आहे.
गेल्या चार वर्षांपूर्वीही या परिसरात चोरट्यांनी बंद घरे, सहकारी संस्थांच्या इमारती आणि ज्वेलर्सची दुकाने लक्ष्य करत मोठी चोरी केली होती. आता पुन्हा सहकारी संस्थांना लक्ष्य केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Comments
Post a Comment