कृष्णाई चषक 2025 चा विजेता ठरला सातारचा अनिकेत बापट.

टक्के शश कृष्णाई चषक 2025 चा विजेता ठरला सातारचा अनिकेत बापट.


****************

वाई प्रतिनिधी

कमलेश ढेकाणे

****************

दि :- 17 जुलै 2025, वाई शहर :-

*स्वच्छ सर्वेक्षण 2025 व माझी वसुंधरा अभियान 6.0, वाई नगरपरिषद, वाई अंतर्गत केया युथ संस्था आयोजित श्री बुद्धिबळ क्लब यांच्या संयुक्त सहकार्यातून भव्य राज्यस्तरीय खुल्या जलदगती एकदिवसीय बुद्धिबळ स्पर्धा श्री कृष्णाबाई संस्थान घाट धर्मपुरी, वाई येथे भरवण्यात आल्या. या स्पर्धेत वाई, सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर, पुणे, बारामती, पांचगणी, महाबळेश्वर, शिरवळ, लोणंद, मुंबई या ठिकाणाहून 380 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.* *या स्पर्धेत 51 आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी, 19 वर्षावरील महिला, दिव्यांग खेळाडू तसेच 55 वर्षावरील खेळाडू सहभागी झाले होते.* *दीड वर्षाच्या वाईच्या ओजस गवळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.*


*अत्यंत चुरशीच्या झालेल्या आठव्या सामन्यात सातारच्या अनिकेत बापटने सर्वोत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करत कोल्हापूरच्या श्रीराज भोसलेचा पराभव करत कृष्णाई चषक 2025 चे विजेतेपद पटाकावले.* व *कोल्हापूरचा श्रीराज भोसले उपविजेता व मिरजचा मुदस्सर पटेलने तीसरा क्रमांक पटकावला.**वाई शहरातून सागर बनकर (प्रथम), साईश ढेकाने (व्दितीय), अभिषेक भारस्कर (तृतीय) खुला गट : जितेश बावळेकर (आठवा), मंगेश चोरगे (नववा) 7 वर्षाखालील गट:- साकेत बावळेकर (पाचवा)*

19 वर्षावरील सर्वोत्कृष्ठ महिला :- सानिका ढेकाणे यांनी बक्षीसे पटकावली. 

*या स्पर्धेचे उद्‌घाटन श्री. विजयकुमार परीट सर , पंचायत समिती गट विकास अधिकारी वर्ग 1,कृष्णा बाई संस्थान घाट धर्मपुरीचे पंच अजय काकडे, केया यूथ संस्था अध्यक्ष अभिजित दळवी, सिध्दार्थ गवळी, प्रसिद्ध व्यापारी विक्रांतसिंग रजपुत (आबा रजपूत), अजिंक्य दिवेकर यांच्या हस्ते करण्यात आला.* *या स्पर्धेचे बक्षीस वितरण कुणाल शहा, प्रियांका भंडारी, संजय शेटे, समीर ढेकाणे, यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी केया युथ संस्थेचे वैभव रजपुत, सचिन कामटे, शितलसिंग डाळवाले, राकेश ढेकाणे, व श्री बुध्दिबळ कलब तर्फे आकाश शेवते, रुपेश हगीर, पियुष सपकाळ, अथर्व जाधव, ओमकार ओतारी, सानिका मुंगसे, साक्षी काटे, राज राऊतराव यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेचे पंच म्हणून शार्दुल तपासे यांनी काम पाहीले.*

*या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांत अडसूळ यांनी केले.* *व ओंकार सपकाळ यांनी आभार व्यक्त केले*

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.

हिम्मत असेल तर राजेश पवाराणी भिलारेना बोट लावून दाखवावे _ माधव पाटील पवळे.